loader
Breaking News
Breaking News
Foto

कोर्टी ते आवाटी रस्ता बनला धोकादायक! एन पी कन्स्ट्रक्शन कंपनीच्या विरोधात आंदोलन करणार कृषी उत्पन्न बाजार समीती चे संचालक देवानंद ढेरे यांचा इशारा

करमाळा चौफेर च्या वतिने एन पी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरु असलेल्या मुजोर कारभारा विरोधात आवाज उठवल्यानंतर कंपनी व कंपनीला पाठीशी घालणाऱ्या प्रशासना विरोधात सर्व स्तरातुन रोष व्यक्त करण्यात येत आहे . या अनुषंगानेच आज कोर्टी ते आवाटी रस्त्यावरील सर्व खड्डे डांबरीकरण करुन बुजविण्यात यावेत तसेच सुरु असलेल्या कामाच्या दर्जाची चौकशी करण्यात यावी अन्यथा तिव्र आंदोलन करु असा इशाराच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवानंद ढेरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिला आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 68 या कोर्टी ते आवाटी पर्यंत च्या रस्त्याचे दोनपदरीकरणाचे काम सुरु असुन पुणे येथील एन पी इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीकडे या कामाचा ठेका असुन दोन वर्षांत हे काम पुर्ण करणे बंधनकारक आहे मात्र वर्ष उलटून गेले तरी फक्त विस टक्के काम पूर्ण झाले आहे. जागोजागी अर्धवट उकरुण ठेवलेला रस्ता ,रस्त्यावर पडलेले खड्डे या मुळे हा रस्ता अपघातस निमंत्रण ठरत आहे. तक्रारी करून देखील प्रशासन कोणतेही कारवाई करत नसल्याने कंपनीकडून सामन्य नागरिकांना जुमानले जात नाही.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

रस्त्याचे नूतनीकरण होणार असल्याने जुन्या रस्त्यावरील खड्डे डांबरा ऐवजी वारंवार मुरुम व मातीने बुजवले जात आहेत. त्या मुळे उन्हाळ्यात धुळीचा तर पावसाळ्यात चिखलाचा प्रचंड त्रास सर्व सामान्य जनतेला सहन करावा लागला आहे .कंपनीकडून कामात प्रंचड दिरंगाई व ढिसाळ पणा होत असल्याने सामान्य नागरीकांची ससेहोलपट सुरु आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

विट ते करमाळा या दरम्यान अनेक ठिकाणी अर्धवट अवस्थेत असलेला रस्ता,व रस्त्यावर असलेले मोठे खड्डे या मुळे अपघात होण्याचा प्रचंड धोका निर्माण झाला आहे. सध्या मंदिरे खुली होणार असल्याने तुळजापूर, करमाळा व राशीन येथे भाविक भक्तांची मोठी गर्दी होत असते हे सर्व भाविक याच रस्त्यावरुन प्रवास करणार आहेत त्या मुळे या रस्त्यावरील सर्व खड्डे डांबरीकरण करुन बुजविण्यात यावेत अन्यथा तिव्र आंदोलन करु आसा इशारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवानंद ढेरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts