कारखानदारांची मस्ती उतरवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी घणसांगवी जिल्हा बिड येथील ट्रॅक्टर मोर्चात बोलताताना दिला .
डिझेलचे दर वाढले, ड्रायव्हरचा पगार वाढला, टायरांची किंमत वाढली तरीही वाहतूक कमिशन मात्र 'जैसे थे' आहे. म्हणून जनशक्ती संघटनेने अतुल खुपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या ट्रॅक्टर आंदोलनाचा मोर्चा घणसांगवी तहसील आवारात पोहचला. यावेळी बोलताना खूपसे पाटील म्हणाले की ज्या ट्रॅक्टर ट्रक वाहतूकदारांच्या जीवावर कारखानदार आपला कारखाना चालवून भले मोठे होतात त्यांनी जर या वाहन मालकाचा प्रश्न नाही सोडवला तर त्यांची मस्ती उतरवू अशा रोखठोक शब्दात त्यांनी इशारा दिला. याबाबत वृत्त असे की, २०१५-१६ साली डिझेलचे दर ६५ रुपये प्रति लिटर होते आज ते १०० च्या घरात पोहोचले आहे. ड्रायव्हरचा पगार ६ हजार होता तो १५ हजार च्या पुढे झाला आहे. आणि टायर यांच्या किमती देखील वाढल्या आहेत. मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रक चे कारखानदारांनी कमिशन आजही वाढवलेले नाही. शिवाय टोळी करार करण्यासाठी चार ते पाच लाखांचा ऍडव्हान्स कारखानदारांकडून दिला जातो. यामध्ये आपली रक्कम टाकून मुकादमाने सोबत करार करावा लागतो. अशात ही टोळी नाही आलीच किंवा पळून गेली तर याचे सर्वस्वी जबाबदारी ट्रॅक्टर व ट्रक मालकांवर राहते. आणि याचा फटका त्यांना बसतो. असे अनेक घाव सोसल्याने हजारो ऊस वाहतूकदार अडचणीत सापडले आहेत. यामुळे जनशक्ती संघटनेने गावोगावी बैठका घेऊन ट्रॅक्टर आंदोलनाचा इशारा दिला. या इशाऱ्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. दरम्यान आज ठरल्याप्रमाणे जनशक्ती संघटनेने ट्रॅक्टर वाहन मालकांच्या मागण्यांसाठी तहसील कार्यालय असे आंदोलन केले. आंदोलनानंतर वाहन मालकांनी भाषणे केली.
कारखाना गळीत हंगाम सुरू झाला की पोळी बनवण्यासाठी त्याची धडपड सुरू होते. पैशाची जुळवाजुळव करून, कारभारीनीच सोनं गहाण ठेवून तो मुकादम सोबत करार करतो. टोळी आली तर ठीक नसेल तर तो देशोधडीला लागतो. शिवाय ऊन वारा पाऊस थंडी अशा कोणत्याच ऋतूंचा विचार न करता कारखान्याला ऊस पोचवण्यासाठी त्याची ओढाताण असते. मग वाढलेल्या डिझेलच्या पटीत त्यांचे ऊस वाहतूक कमिशन वाढवून दिले तर काय हरकत ? कारखानदार मोठे होतात मग वाहन मालकांनी कधी मोठे व्हायचे असा सवाल यावेळी प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी व्यक्त केला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.