loader
Breaking News
Breaking News
Foto

२०२४ पर्यंत दहीगांव ची योजना पूर्ण करणार - आमदार संजयमामा शिंदे

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील राहीलेले सर्व प्रश्न सोडविणार असुन , दहीगांव उपसा सिंचन योजना २०२४ पर्यंत शंभर टक्के पूर्ण करून १०५०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणणार असल्याचे प्रतिपादन , करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे यांनी देवळाली येथे सरपंच अशिष गायकवाड यांच्या जाहीर प्रवेश कार्यक्रम प्रसंगी केले या वेळी अधीक बोलताना ते म्हणाले 2017 ला दहीगावची सुप्रमा संपली होती आमदार झाल्यानंतर दहीगाव योजनेच्या सुधारित सुप्रमा साठी पाठपुरावा सुरु केला सुप्रमा मंजूर करणे सोपी गोष्ट नव्हती ,तिन समित्या द्वारे पडताळनी झाल्यानंतर हि सुप्रमा मंजूर झाली आहे. शंभर टक्के काम पुर्ण होई पर्यंत मी समाधानी नसून श्रेयवादासाठी कोणतेही काम करणार नसल्याचे त्यांनी सांगीतले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक तथा देवळाली चे सरपंच आशिष गायकवाड यांनी आपल्या ७ ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्तेसमवेत आ. संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला . यावेळी आ. शिंदे व माजी आ.जयवंतराव जगताप यांच्या हस्ते आशिष गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला . उपसरपंच प्रतिनिधी धनंजय शिंदे , ग्रामपंचायत सदस्य पोपट बोराडे , गहिनीनाथ गणेशकर , किसन चांदणे यांच्या सह इतर ग्रामपंचायत सदस्य यांनी यावेळी आ.शिंदे गटात प्रवेश केला .तसेच नेरले चे माजी उपसरपंच काकासाहेब पाटील , लतीफ पटेल , महादेव लोंढे , रावसाहेब काळे यांनी ही आमदार संजयमामा शिंदे गटात प्रवेश केला . देवळाली येथील पंचायत समितीचे माजी उपसभापती स्व.कल्याणभाऊ गायकवाड यांचे नावाने लोकवर्गणीतून प्रवेशद्वार बांधण्यात येणार आहे. या प्रवेशद्वाराचा भूमिपूजन समारंभ ४ ऑक्टोबर रोजी सोमवारी सायंकाळ ७ वाजता आ. संजयमामा शिंदे यांचे हस्ते करण्यात आला.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी माजी आ. जयवंतराव जगताप म्हणाले की ,गट बदलणं , पार्टी बदलणं ही आमच्या करमाळा तालुक्यातील परंपरा आहे , तुमच्यासाठी मी शरद पवार यांच्या सारखा भर पावसात उभं राहणार आहे , त्याशिवाय तुम्ही मामाला २०२४ ला पुन्हा संधी देणार नाही . तालुक्यातील सर्व गटांचा जन्म जगताप गटातून झाला असल्याचे याप्रसंगी ते म्हणाले.यावेळी माढा पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रकांत सरडे , माजी पंचायत समिती सदस्य विलास दादा पाटील , माजी जिल्हा परिषद सदस्य उद्धव माळी , जिल्हा दूध संघाचे माजी व्हा.चेअरमन राजेन्‍द्रसिंह राजेभोसले , मांगी चे ग्रामपंचायत सदस्य सुजित बागल , पंचायत समितीचे सभापती चंद्रहास निमगिरे ,माजी जिल्हा परिषद सदस्य विलास राऊत , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड , पंचायत समितीचे सदस्य राहुल सावंत , आदीनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी झोळ , कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे ,पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव , डॉ . गोरख गुळवे , मानसिंग खंडागळे , करमाळा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दादासाहेब लबडे , विट चे सरपंच उदय ढेरे , ग्रामपंचायत सदस्य अमर भांगे , युवक नेते उमेश इंगळे , झरे चे सरपंच प्रशांत पाटील , राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अभिषेक आव्हाड , राष्ट्रवादी काँग्रेस युवती तालुका अध्यक्ष शितल शिरसागर, कार्याध्यक्ष स्नेहल अवचर ,राजेंद्र धांडे , लतीष पाटील , अशोक तकीक , सतीश शेळके , सुनील रेडे , माजी संचालक विवेक येवले आदी उपस्थित होते.यावेळी मांगीचे सुजित बागल , राजेंद्र बाबर , गौतम ढाणे , सुहास गलांडे , राहुल सावंत , सरपंच आशिष गायकवाड , कन्हेरगांव चे माजी उपसरपंच धनंजय मोरे यांनी मनोगत व्यक्त केले .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सूत्रसंचालन डॉ . विकास वीर यांनी केले तर आभार प्रदर्शन ऍड .अजिंक्य गायकवाड यांनी मानले . यावेळी तालुक्यातील शिंदे गटाचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts