सुविधा मिळत नसतील तर आरोग्य केंद्र कायमचे बंद करा :-बापू मोरे शिवसेना तालुका संपर्कप्रमुख ">
loader
Breaking News
Breaking News
Foto

सुविधा मिळत नसतील तर आरोग्य केंद्र कायमचे बंद करा :-बापू मोरे शिवसेना तालुका संपर्कप्रमुख

"प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांमध्ये ताप, सर्दी, खोकला आदी सर्वसाधारण आजारांसह रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजाराची तपासणी करून निदान, मोफत औषधोपचार केले जातील शासनाकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचविल्या जातील असे शासन सांगत प्रत्यक्षात मात्र उपकेंद्रांना सर्दी ,थंड ताप, खोकला या आजारांची औषधंचं उपलब्ध होत नसल्याचे समजत आहे. त्या मुळे अधिकारी व कर्मचारी यांना नागरींकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. निदान कोरोनाच्या काळात तरी ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रावर पुरेसा औषध साठा उपलब्ध करुन द्या आशी देखील मागणी जोर धरत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

साधारण चार हजार ते पाच हजार लोकसंख्या गृहीत धरून एक आरोग्य उपकेंद्र असते. या उपकेंद्रा मार्फत सरकारी आरोग्य सेवा पुरविली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांचे नियंत्रणात एक आरोग्य सेविका एक आरोग्य सेवक उपकेंद्रात काम करतात. या दोन कर्मचार्‍यांबरोबर आता आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून स्वतंत्र डॉक्टर उपकेंद्रात रुग्ण सेवा करतील असे शासनाने जाहिर केले आहे. मात्र हि सर्व यंत्रणा म्हणजे "रात्र थोडी व सोंगे जास्त" आशी आवस्था असुन नेमुण दिलेल्या ठिकाणी आरोग्य सेवीका राहत नसतील तर उपयोग आसा सवाल देखील मोरे यांनी केला आसुन करमाळा आरोग्य विभागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आरोग्य मंत्री डॉ राजेश टोपे यांच्या कडे तक्रार करणार असल्याचे सांगीतले आहे.

माझ्याकडे तिन उपकेंद्राची जबाबदारी आहे त्यात कोरोणाच्या अतिरिक्त कामामुळे आडचणी येत आहेत. अन्यथा मि दररोज झरे उपकेंद्रावर उपल्बध असतो. नवनाथ शिंदे आरोग्य सेवक झरे प्राथमिक उपकेंद्र

झरे प्रतीनिधी

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सध्या गावोगावी करोनाच्या भीतीचे वातावरण आहे. अशा वातावरणात आरोग्याची काळजी घेणारे अधिकारी व कर्मचारी राहत नसतील, या ठिकाणी सर्दी, तापेची साधी गोळी मिळत नसेल तर तर ते आरोग्य उपकेंद्र काय कामाचे ? असा सवाल शिवसेना करमाळा तालुका संपर्क प्रमुख बापु मोरे यांनी केला आहे .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts