करमाळा येथे होणारे आरटीओ कॅम्प बंद झाल्याने लायसन्स काढण्यासाठी अनेकांना अकलुज वार्या कराव्या लागत होत्या .त्याच बरोबर आरटीओ ऑफिसशी निगडित इतर कागदपत्रे मिळवणे जिकरीची झाले होते मात्र धैर्यशील मोहिते पाटील व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून करमाळा तालुक्यातील बंद झालेले आरटीओ कॅम्प पुन्हा सुरु करण्यात आले आहे.त्यामुळे वाहन चालक परवाना काढणार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पोफळज ता.करमाळा येथील एका कार्यक्रमाप्रसंगी मा.धैर्यशील मोहिते पाटील आले असता त्यांच्याकडे पोफळज येथील रहिवाशी श्री.दत्तात्रय पवार सर आणि परिसरातील इतर ग्रामस्थ, तरुणांनी केलेल्या मागणी प्रमाणे आर टी ओ कॅम्प पुन्हा एकदा करमाळा येथे सुरू करण्यासाठी मागणी केली होती. त्या मागणीची तात्काळ दखल घेऊन आ. रणजितसिंह मोहिते पाटील व मा.धैर्यशील मोहिते पाटील यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांच्याशी चर्चा करून करमाळा येथे व अकलूज अंतर्गत इतर तालुक्यातील ठिकाणी आरटीओ कॅम्प चे पुन्हा आयोजन करण्यात यावे व तरुण मुलांचे वाहन चालक परवाने व इतर कामे तात्काळ मार्गी लागण्याच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा केली. या मागणीची दखल आरटीओ विभागाकडून घेण्यात आली आहे.
अकलूज आरटीओ कडून कॅम्प चे प्रसिद्धी पत्रक प्रकाशित करण्यात आले आहे, पुन्हा आरटीओ कॅम्प सुरू होणार असल्याने तरुण वर्गात उत्साह वाढला आहे आणि काही किरकोळ कामासाठी आरटीओ कार्यालयात जाण्याचे प्रमाण कमी होईल त्यामुळे नागरिकांना प्रवास व इतर गोष्टींचा मनस्ताप देखील होणार नाही. करमाळा येथे २५ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्राम गृह येथे कॅम्प होणार आहे.असे ही आरटीओ विभागाकडून सांगण्यात आले आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.