आदिनाथ कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावरील विषयावरुन बागल व पाटील गटात सवाल प्रतिसवाल आता चांगलेघ रंगात आले असून पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी काल विषय पत्रिकेवरील क्रमांक 9 या विषयावरुन सवाल उपस्थित करत आदिनाथ भाडेतत्त्वावर देत असताना शेअर्सची दर्शनी किंमत वाढवण्याचा विषय कसा घेतला गेला याचे स्पष्टीकरण बागल गटाने द्यावे अशी मागणी केली होती . करमाळा चौफेरने हे वृत्त प्रसिद्ध करताच आदिनाथ कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी सा करमाळा चौफेरशी तात्काळ संवाद साधला व स्पष्टीकरण दिले. या सोबतच त्यांनी शासनाचा प्राप्त आदेशही पाठवला. यावेळी डोंगरे यांनी सांगितले की शासनाने राज्यातील सर्वच साखर कारखान्यांना हा आदेश शासन आदेश क्रमांक ससाका 2020/प्र.क्र.85/3-स) पारित केलाअसून त्यावर चर्चा होऊन त्यास मान्यता दिली जावी म्हणून आम्ही हा विषय अजेंड्यात समाविष्ट केला आहे.हा आदेश लागू झाला असून बंधनकारक आहे.यामुळे पाटील गटाच्या प्रवक्ते सुनील तळेकर यांनी या विषयाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करु नये.कारखान्याच्या अडचणी आम्हास ठाऊक आहेत.आदिनाथला सुस्थितीत आणण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत. तळेकर यांनी काठावर बसून उगीच कारखाना प्रशासनाबद्दल गैरसमज पसरवून व हा विषय चुकीच्या पध्दतीने मांडून सभासदांची दिशाभुल करु नये असा इशाराही यावेळी चेअरमन डोंगरे यांनी दिला.
या शासन आदेशावर पाटील गटाची भुमिका जाणुन घेण्यासाठी पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांच्याशी करमाळा चौफेर ने पुन्हा संपर्क साधला असता प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले की शासनाचा हा आदेश आम्हीसुध्दा वाचला आहे. या आदेशानुसार केंद्रशासनाने इथेनाॅल पुरवठा व उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी राज्यांना हा आदेश लागू केला आहे. या आदेशात राज्यातील 126 कारखान्यांना इथेनाॅल निर्मितीसाठी व्याज अनुदान देण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा स्पष्ट उल्लेख आहे.यात 67 सहकारी कारखाने आहेत. यानूसार हा आदेश ज्या कारखान्यांना इथेनाॅल अथवा आसवानी प्रकल्प उभा करावयाचा आहे=इतर उत्पादने निर्माण करणारे सक्षप्रकल्प उभा करायचे आहेत, क्षमतावाढ अथवा विस्तार करावयाचा आहे, आर्थिक स्थिती क्षीण झाल्याने या सहप्रपल्पासाठी कर्ज उभारणी करताना अडचणी येत आहेत, अशा सर्व कारखान्यांना भाडभांडवल उभा करुन स्वनिधीत वाढ करण्यासाठी हा आदेश उपयोगी असुन जेणेकरून इथेनाॅल अथवा आसवानी प्रकल्प चालू करण्यासाठी किंवा चालू असतील तर त्याची क्षमता वाढवण्यासाठी शेअर्सच्या माध्यमातून स्वनिधी वाढवण्यासाठी याचा अंमल होईल. परंतू आदिनाथ कारखान्यावर इतर कोणताही प्रकल्प चालू नाही, गाळप हंगाम चालू नाही. कर्ज उभारणीची सर्व दारे बंद झाल्यामुळे कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास साखर आयुक्ताकडून परवानगी घेतली आहे. यामुळे मग शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करुन आताच भागभांडवल जमा केले तर देणार कोणाला? अगोदर कारखाना सुरु तरी करावा, अन्यथा वरील आदेशाची अंमलबजावणी करुन जर कोणती वित्तीय संस्था आदिनाथला कर्ज देणार असेल तसेही स्पष्ट करावे. अन्यथा भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याचा करार रद्द झाला असे तरी सभासदांना सांगावे. आम्ही मागणी करतोय म्हणून नाही तर आदिनाथची सध्याची अपवादात्मक स्थिती पाहता हा आदेश कारखान्यास लागू होतोय का याचा कायदेशीर सल्ला सहकार खात्याकडून घ्यावा. सभासदांची खरी दिशाभूल संचालक मंडळ करत आहे. असा आरोप केला.
दिवस मोजण्याचा प्रकार थांबवून आदिनाथचा गाळप हंगाम अगोदर सुरु करावा. कारखाना मशीनरी वर गंज चढण्याची वाट पहाणार आहात का? कामगार व सभासद कारखाना सुरू होईल या आशेवर असताना आज कारखाना प्रशासनाकडून होत असलेली दिरंगाई आदिनाथला आणखी संकटात ढकलत असल्याचा हल्लाबोल देखील यावेळी सुनील तळेकर यांनी केला आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.