loader
Breaking News
Breaking News
Foto

आदिनाथ भाडेतत्त्वावर देत आहात तर शेअर्सची किंमत का वाढवता? पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांचा सवाल

आदिनाथ कारखाना हा भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याची हालचाल गेली अनेक महिन्यांपासून सुरू आहे. बहुतांश प्रमाणात प्रक्रिया पूर्ण होत आली असताना आज पाटील गटाकडून बागल नेतृत्वावर आरोपाची तोफ डागण्यात आली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

उद्या दिनांक 30 सप्टेंबर रोजी आदिनाथ कारखान्याची सर्वसाधारण सभा होत असून कोरोना निर्बंधांमुळे हि सभा ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. या सभेच्या विषयपत्रीकेवरुन पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी आज सत्ताधारी संघालक मंडळास काही विषयांवर स्पष्टीकरण द्यावे असे आवाहन केले.याबाबत सा करमाळा चौफेरशी संवाद साधताना तळेकर यांनी सांगितले की उद्या आदिनाथ कारखान्याची सर्वसाधारण सभा होणार असून वर्तमानपत्रात सभेतील विषय प्रसिध्द झाले आहेत. या विषयांमध्ये क्रमांक 9 मध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडला गेला आहे.तो विषय असा आहे की संस्थेच्या शेअर्सची (भागाची) दर्शनी किंमत रुपये 10 हजार वरुन 15 हजार करणे बाबत सहकार पणण व वस्रोद्योग विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्राची माहिती व नोंद घेऊन त्यास मान्यता देणे बाबत असा आहे. वास्तविक पाहता जर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याची तयारी संचालक मंडळ करत असेल तर मग आता शेअर्सची दर्शनी किंमत वाढवण्यासाठी संचालक मंडळ सकारात्मक का आहे? जर हा विषय जुना व पुर्वी निर्णय घेतलेला असेल तर मग आज इतक्या कालावधीनंतर हा विषय परत एकदा कामकाज पटलावर का आला आहे? आदिनाथ कारखान्याचे वार्षिक ऑडिट झाल्यानंतर सुध्दा भाग किंमत वाढवणे प्रक्रिया कागदोपत्री अपुर्ण राहीली आहे का? असे अनेक प्रश्न सभासदांच्या मनात आज उभे आहेत. याचे स्पष्टीकरण कारखाना प्रशासनाने सभेपूर्वी द्यावे. कारखाना स्थापनेपासून पुढे शेअर्सची किंमत 2000 रुपयांवरून 5000 रुपये करण्यात आली व नंतर मध्यंतरी एकदा 5000 रुपयांवरून 10 हजार रुपये इतकी करण्यात आली. कारखाना गाळप सुरु असताना सभासदांच्या हितासाठी कारखान्यात सुधारणा करणेपायी शेअर्स रक्कम वाढवली गेली. त्यावेळी कारखाना चालू स्थितीत होता. मग गाळप क्षमता वाढवण्यासाठी असो अथवा इतर तांत्रिक सुधारणे विषयी असो सभासदांच्या कडून भागभांडवल उभे केले. परंतू आता कारखाना बंद स्थितीत आहे व सभासदाना यातुन कसलाही लाभांश मिळत नसताना भागभांडवल रक्कम वाढवणे कितपत योग्य आहे? भांडवल नसल्याकारणास्तव कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देत असताना हा शेअर्स रक्कम वाढवण्याचा हेतू स्पष्ट करण्यात यावा.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

एकीकडे आदिनाथ कारखान्याची निवडणूक लागली की ज्यांनी शेअर्स रक्कम पुर्ण भरली नाही अशी नावे मतदार यादीतून वगळण्याच्या घटना यापुर्वी अनेकदा झाल्या. आदिनाथ कारखाना गाळप हंगाम चालू असताना ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या ऊस बिलातून वाढवलेली भाग रक्कम भरुन घेऊन त्याचा शेअर पुर्ण करणे सहज शक्य होते. आता अनेक वर्षांपासून गाळप बंद असल्याने दर्शनी किंमत रोख स्वरूपात वसुल करणार का? आणि जर हि केवळ कागदोपत्री प्रक्रिया असेल तर त्यास परत एकदा सभेत मान्यता का देण्यात यावी ? या प्रश्नांची सभासदांना समाधान कारक उत्तरे दिली तरच हा विषय मांडण्याचा साफ उद्देश सभासदांच्या लक्षात येईल अन्यथा आदिनाथ कारखाना सहकारी तत्वावरुन खाजगीकरणाकडे पाठवण्यासाठी ह्या प्रक्रिया आहेत अशी शंका भोळ्याभाबड्या सभासदांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. यामुळे बागल नेतृत्वाने या प्रश्नावर सभासदांसाठी स्पष्टीकरण देऊन सहकारातील सभासदांच्या हक्काचे संरक्षण करावे. ऑनलाईन सभा असल्याने शेतकरी सभासद यात कितपत सहभागी होतील हा संशोधनाचा विषय असेल. पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे कारखान्याशर जाऊन उद्याच्या ऑनलाईन सभेत आपला सहभाग नोंदवला असलेल्या सभासदांनाही कदाचित नेटवर्क सारख्या समस्येस तोंढ द्यावे लागणार अशी शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. यामुळे किमान उद्याच्या सभेतील सर्वच विषयांवर एक विस्तृत प्रेसनोट जाहीर करुन सभासदांना सभे विषयी माहिती द्यावी अशी मागणी सुनील तळेकर यांनी पाटील गटाच्या वतीने केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts