loader
Breaking News
Breaking News
Foto

अशिष कल्याणभाऊ गायकवाड यांनी दिला "आदिनाथ" च्या संचालक पदाचा राजीनामा ! चार तारखेला करणार आमदार शिंदे गटात प्रवेश.

आदिनाथ सह साखर काखान्याचे संचालक तथा देवळाली गावचे विद्यमान युवा सरपंच आशिष कल्याणभाऊ गायकवाड यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा चेअरमन व कार्यकारी संचालक यांच्याकडे सादर केला आहे . कराखाना स्थळावर कार्यकारी संचालक व चेअरमन उपस्थित नसल्याने गायकवाड यांनी सदरचे राजीनामा पत्र चेअरमन व कार्यकारी संचालक यांना व्हाट्सप वरती पाठवला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आशिष कल्याणभाऊ गायकवाड हे देवळाली गावचे सरपंच असुन स्व कल्याणभाऊ गायकवाड यांचे चिरंजीव आहेत. स्व कल्याणभाऊ गायकवाड यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर त्यांची संचालक पदी निवड करण्यात आली होती.

आमदार संजयमामा शिंदे यांच्या कडे विकास कामे करण्याची धमक आहे, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व समर्थकांचा विचार घेवुन शिंदे गटासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या माध्यमातून देवळाली सह पंचक्रोशीतील गावात विकासकामे करुन समस्या सोडवण्याचा प्रमाणीक प्रयत्न करणार आहे. आज आदिनाथ च्या संचालक पदाचा राजिनामा चेअरमन व कार्यकारी संचालक यांच्याकडे पाठवला आहे. येत्या चार तारखेला मेळावा घेऊन आमदार संजय शिंदे गटात प्रवेश करत आहे - अशिष कल्याणभाऊ गायकवाड

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

गायकवड हे बागल यांचे समर्थक म्हणून ओळखले जात होते मात्र सध्या ते आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटासोबत काम करणार असून चार तारखेला भव्य मेळावा घेऊन आमदार संजयमामा शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts