loader
Breaking News
Breaking News
Foto

बागल गटाला जोरदार धक्का ! खंदे समर्थक स्व कल्याणभाऊ गायकवाड यांचे चिरंजीव सरपंच अशिष गायकवाड यांचा संजय शिंदे गटात प्रवेश निश्चित.

विधान सभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून बागल गटाची सुरु असलेली वाताहत थांबताना दिसत नाही. खंदे समर्थक व दिग्विजय बागल यांचे विश्वासु संतोष वारे यानी राष्ट्रवादीत प्रवेश करुन बागल गटाला या पुर्वीच सोडचिठ्ठी दिली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मध्यंतरी दिग्विजय बागल यांनी जनसंपर्क दौरा सुरु करुन बागल गटात उत्साहाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला ,मात्र या दौऱ्यात आदिनाथ, व मकाई च्या व्यथा लोकांकडून मांडण्यात आल्या . त्या मुळे जनसंपर्क दौरा गुंडाळावा लागला होता.आगामी जिल्हापरिषद व पंचायत समीती निवडणुकात आमदार संजयमामा शिंदे व जयवंतराव जगताप युती तसेच माजी आमदार नारायण पाटील यांचे तगडे आव्हान समोर असताना देवळाली सारखा बालेकिल्ला आमदार संजय शिंदे यांनी काबीज केल्याने बागल गटाला हा फार मोठा धक्का मानला जात आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

अशिष गायकवाड हे स्व कल्याणभाऊ गायकवाड यांचे चिरंजीव आहेत व ते देवळालीच्या सरपंच पदाबरोबरच आदिनाथ च्या संचालक पदाची धुरा संभाळत आहेत.दिग्विजय बागल यांचे ते खंदे समर्थक व अत्यंत विश्वासु म्हणून त्यांची ओळख आहे. स्व कल्याणभाऊ गायकवाड हे सलग तिन वेळा पंचायत समितीतीत सदस्य होते उपसभाती पद त्यांनी सांभाळले आहे .स्व कल्याणभाऊ गायकवाड यांच्या पत्नी पंचायत समितीतीत सभापती पदावर देखील विराजमान झाल्या होत्या. स्व कल्याणभाऊ गायकवाड हे आदिनाथ वर संचालक म्हणून विजयी झाले होते हि त्यांची शेवटची निवडणूक ठरली.गायकवाड यांचे निधन झाल्यानंतर बागल गटाकडून आशीष गायकवाड यांना संचालक पदावर घेण्यात आले होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

झरे येथील नारायण पाटील गटाचे माजी सरपंच प्रशांत पाटील यांना आपल्या गटात खेचून आमदार संजय शिंदे यांनी धमाका केला होता त्यानंतर देवळाली चे विद्यमान सरपंच अशिष गायकवाड यांना आपल्या गटात खेचून विट जिल्हापरिषद गटावर आमदार संजयमामा शिंदे यांनी वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts