loader
Breaking News
Breaking News
Foto

शिक्षकांचा सन्मान हाच आमचा अभिमान- सभापती अतुलभाऊ पाटील

शिक्षकांचा कर्तुत्वाने सन्मान होणे हा आमच्या सर्वांना अभिमानाची गोष्ट आहे.आपल्या हातून उत्कृष्ट विद्यार्थी घडावेत व त्यातून शिक्षकांचा झालेला सन्मान ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन करमाळा पंचायत समितीचे सभापती आतुलभाऊ पाटील कंदर केंद्राच्या शिक्षण परिषदेमध्ये व्यक्त केले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

माहे सप्टेंबर 2021 ची कंदर केंद्राची आँफलाईन शिक्षण परिषद कोरोनो बाबतचे नियम पाळून श्री अजित दादा पवार विद्यालय वडशिवणे या ठिकाणी आयोजित केली होती यावेळी सभापती अतुल भाऊ पाटील,गटशिक्षणाधिकारी श्री राजाराम भोंग साहेब,विस्तार अधिकारी श्री अनिल बदे साहेब ,केम केंद्र प्रमुख श्री महेश कांबळे,केंद्र प्रमुख श्री साईनाथ देवकर साहेब,मुख्याध्यापखक श्री भिमराव भोसले सर,श्री विष्णू फंड सर ,सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

माहे सप्टेंबर 2021 शिक्षण परिषदे मध्ये प्रस्ताविक केंद्र प्रमुख श्री साईनाथ देवकर यांनी केले.गटशिक्षणाधिकारी श्री राजाराम भोंग साहेब,श्री अनिल बदे साहेब,श्री सखाराम राऊत,श्री शहाजी बादल,श्री रमेश कोडलिंगे ,श्री अनंत कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.स्वच्छ शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा वडशिवणे,सातोली,पन्हाळकर वस्ती,पुनर्वसन कंदर,पांगरे या शाळांचा सन्मान साभापती अतुल भाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी केंद्रप्रमुख श्री साईनाथ देवकर यांच्या तर्फे उत्कृष्ट शाळांना बक्षिस देण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

लोकमंगल पतसंस्थेचा पुरस्कार मिळाले बद्दल श्रीम रत्नमाला होरणे यांचा सत्कार करण्यात आला .विविध शैक्षणिक विषयावर चर्चा करण्यात आली.या शिक्षण परिषदेमध्ये सुत्रसंचालन श्री अतुल घोगरे सर यांनी केले तर आभार श्री भास्कर खुपसे सर मानले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts