loader
Breaking News
Breaking News
Foto

घटस्थापने आगोदर कमलाभवनी मंदिर रस्त्याची दुरुस्ती करा - भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांची मागणी

घटस्थापने पासुन कमलाभवानी मातेच्या यात्रेस सुरवात होणार आहे शहर व तालुक्या सह राज्यभरातून भाविक भक्त दर्शनासाठी येत असल्याने घटस्थापने आगोदर करमाळा शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज पुतळा ते कमलाभवानी मंदिर रस्त्यावरील खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करावा अशी आग्रही मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी संबंधित विभागाकडे केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

चिवटे यांनी म्हटले आहे की ,कोरोनाच्या सावटा मुळे गेल्या वर्षापासुन जनतेला सर्व सण ,उत्सव साजरा करता आले नाहीत, सात ते आठ महिन्यांपासून मंदिरे देखील बंद होती. मात्र ७ ऑक्टोंबर पासुन मंदिरे सुरु होत असल्याने घटस्थापना व नवरात्र उत्सवास नागरींकाची वर्दळ वाढणार आहे. करमाळा शहरातील कमलाभवानी मंदिर देखील राज्यभर प्रसिद्ध असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात, शहरातील महिला ,लहान मुले नागरिक यांची दर्शनासाठी गर्दी होत असते तर अनेक जण कमलाभवनी मातेस दंडवत आर्पण करत असतात .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

मात्र छत्रपती शिवाजीमहाराज महाराज पुतळा ते कमलाभवनी मंदिर रस्त्यावर प्रचंड खड्डे झाले आहेत तसेच जातेगाव (नगर) टेंभुर्णी या बायपास रोडवर देखील मोठेमोठे खड्डे पडल्याने शहर व तालुक्या सहित बाहेर जिल्ह्यातील भाविक यांना देखील त्रास सहन करावा लागणार असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

संबंधित विभागाकडून हलगर्जी पणा होवुन भाविक भक्तांना तसेच नागरींकाना त्रास झाल्यास भाजपा च्या वतिने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील चिवठे यांनी दिला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts