loader
Breaking News
Breaking News
Foto

कुकडीचे ओव्हरफ्लो पाणी मांगी तलावात सोडा -दिग्विजय बागल

कुकडीचे ओव्हरफ्लो पाणी मांगी तलावात सोडा अशी महत्वपूर्ण मागणी मकाई चे चेअरमन दिग्विजय ग्विजय बागल यांनी प्रसिद्धीपत्रका द्वारे केली आहे.यात त्यांनी म्हटले आहे की,कुकडी लाभक्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे वरील धरणे मुबलक प्रमाणात भरली आहेत. परंतु करमाळा तालुक्यात पावसाचे प्रमाण अल्प आहे. शेतकऱ्यांची पीक यावर्षी चांगली आली आहेत. मांगी तलाव परिसरात पाऊसच न‌ झाल्यामुळे तलावात पाण्याची कमतरता भासत आहे. जर वरील कुकडी‌ ओव्हर फ्लोचे पाणी मांगी तलावात सोडले तर यांचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मांगी तलावावर आसपासची दहा-बारा गावे अवलंबून आहेत. या गावांनाही ‌तलावाच्या पाण्याचा फायदा होत असतो.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

उजनी धरण शंभर टक्के कडे वाटचाल करत आहे, सिना कोळगाव धरण ही यावर्षी चांगले भरले आहे, परंतु मांगी तलाव अद्याप ३५ टक्केवरच आहे. मांगी तलावावर यंदा जवळ जवळ २१०० हेक्टर ऊस क्षेत्र भिजणारे आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत एक आवर्तन सोडून हा तलाव भरणे गरजेचे आहे. कुकडीचे ओव्हर फ्लोचे पाणी प्रत्येक वेळी तालुक्याला कमी प्रमाणात मिळते. या पाण्याचा फायदा त्यामानाने खूप कमी प्रमाणात आपल्याला होतो. त्यामुळे यंदा वरील लाभक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे, लवकरच ओव्हर फ्लोचे पाणी मांगी तलावात सोडले तर त्यांचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. मांगी तलावाची क्षमता मोठी आहे. या तलावामुळे परिसरातील सर्वच गावांना यांचा फायदा होत असतो. कुकडीवरील धरणांची टक्केवारी पाहता वरील सर्वच धरणे सरासरी ऐशी टक्के भरली आहेत. वर मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे वरुन येणारे ओव्हरफ्लोचे पाणी करमाळा तालुका सह मांगी तलावात सोडवण्यात यावे अशी आपली प्रमुख मागणी असल्याचे बागल यांनी सांगितले.

कुकडी लाभक्षेत्र मध्ये येणाऱ्या सर्व धरणे सरासरी ऐशी टक्के भरली आहेत. उजनी, सिना कोळगाव धरणाची वाटचाल शंभर टक्के कडे आहे. मांगी तलाव अद्याप ३५ टक्क्यांवरच आहे. मांगी तलाव परिसरात जवळपास २१०० हक्टेर ऊस आहे. यामुळे कोणत्याही परिस्थितीत एक आवर्तन सोडून मांगी तलाव भरणे गरजेचे आहे. आपल्याच तालुक्यामध्ये अजून ही समाधानकारक पाऊस नाही. शेतकऱ्यांची पिके आताशी हाताशी येत आहेत. यामुळे पाण्याची आवश्यकता भासणार आहे. गेल्यावेळी चांगला पाऊस होता म्हणून शेतकऱ्यांनी कुकडी कॅनाल परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊस लावला आहे. जर ओव्हर फ्लोचे पाणी तालुक्यासह मांगी तलावात आले तर याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.असे ही बागल यांनी म्हटले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts