loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातुन जलजीवन मिशन योजने अंतर्गत करमाळा तालुक्यासाठी 4 कोटी निधी मंजूर

करमाळा विधानसभा मतदार संघातील पाणी पुरवठा योजनेसाठी जलजीवन मिशन योजनेतून तालुक्यातील 4 गावांना एकूण 3 कोटी 84 लाख 855 रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यामध्ये चिखलठाण नंबर 1 व 2 या गावांसाठी 1 कोटी 98 लाख 766 रुपये तसेच वांगी नंबर 1 व 2 या गावांसाठी 1 कोटी 86 लाख 89 रुपये अशी तरतूद केली गेलेली आहे. या निधीमधून संबंधित गावात विहीर ते गाव अशी पाईपलाईन ,गावांतर्गत पाईप लाईन, पाण्याची टाकी, जलशुद्धीकरण केंद्र इत्यादी कामे केली जाणार आहेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत सदर निधी मंजूर झालेला असून यामध्ये 10 टक्के लोकनिधी संबंधित गावाने भरणे अपेक्षित आहे. उर्वरित रक्कम केंद्र शासनाकडून 50 टक्के व राज्य शासनाकडून 50 टक्के दिली जाणार आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts