loader
Breaking News
Breaking News
Foto

कोरोना मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार ५० हजाराची मदत ! केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती.

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्या आपत्ती निवारण निधीतून ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल आशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. देशात सुमारे ४लाख ४६ हजार जणांचा कोरोनाने मृत्यु झाला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कोरोनामृतांच्या कुटुंबीयांना ५० हजार रु अर्थ साह्य देण्याची शिफारस राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केली होती या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले.यापुढे देखील जे रुग्ण कोरोनाने मृत होतील त्यांना देखील हि मदत मिळणार आहे.

अशी असेल मदतीची प्रक्रिया मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची रक्कम मिळण्यासाठी सरकारी छापील अर्ज संबंधित डॉक्टर वा रुग्णालय यांच्या प्रमाणपत्रासह जिल्हा आपत्ती निवारण सहायता निधी अधिकारी वा त्यांच्या कार्यालयात सादर करावा लागेल. या अर्जावर संबंधित यंत्रणेला ३० दिवसांत निर्णय घ्यावा लागेल. आर्थिक मदत थेट बँकेत जमा करण्यात येईल. आलेल्या अर्जावर निर्णय घेण्यासाठी जिल्हा पातळीवर समिती असेल, कोणताही अर्ज फेटाळताना त्याचे स्पष्ट कारण लेखी स्वरूपात देण्याची जबाबदारी या समितीची असेल

वैभव फरतडे ✍ (मुंबई प्रतिनीधी)

नैसर्गिक आपत्तीमध्ये मरण पावलेल्यांच्या कुटुंबास ज्या प्रकारे अर्थसाह्य दिले जाते, तोच निकष कोरोनाच्या मृतांबाबत का लावत नाही, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने जूनमध्ये केंद्राला विचारला होता. तसेच मृत्यूच्या दाखल्यावर कोरोनाचा उल्लेख असावा, असेही सांगितले होते. या अनुषंगानेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना थोडाफार का होईना दिलासा मिळणार आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts