ॲमेझॉन अथवा फ्लिपकार्ट वर आदिनाथ कारखाना ऑनलाईन विक्रीस काढला गेला तर नवल वाटायला नको अशी खोचक टिका पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी सत्ताधाऱ्यांवर केली असुन आदिनाथ कारखान्याची सत्ता एकहाती पाटील गटाच्या हाती असती तर हि वेळ आली नसती असे देखील तळेकर यांनी म्हटले आहे.
दिनांक 30 सप्टेंबर रोजी आदिनाथ कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा असलेने याबाबत करमाळा चौफेरने माजी आमदार पाटील गटाची भुमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला या वेळी तळेकर बोलत होते, अधीक बोलताना तळेकर म्हणाले की,आदिनाथ कारखाना पुर्ण बहुमताने एक वेळेस माजी आमदार नारायण पाटील यांच्या हाती दिला असता तर आज कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास देण्याची वेळ आली नसती , सन 2014 ते 2019 या कालावधीत माजी आमदार नारायण पाटील यांना जनतेने आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. पाच वर्षात भ्रष्टाचाराचा एकही ठपका मा .आ. नारायण पाटील यांच्यावर ठेवता आला नाही. शेकडो कोटींची विकासकामे मंजूर करुन ती पुर्ण करण्यासाठी पाटील यांनी अहोरात्र मेहनत घेतली.तालूक्यातील प्रशासन यंत्रणा गतीमान करुन सर्वसामान्यांना चांगली सेवा दिली. यामुळेच सभासद शेतकऱ्यांनी जर एक वेळेस पुर्ण बहूमत असलेले संचालक मंडळ नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडूण दिले असते तर आदिनाथ कारखान्याची चांगली अवस्था पहायला मिळाली असती. आजपर्यंत केवळ सत्तेतुन पैसा व पैशातून सत्ता हे समिकरण वापरत सत्ताधारी मंडळींनी ज्या त्या काळात आदिनाथवर कर्जाचा डोंगर उभा केला. कामगार व ऊस उत्पादक सभासद यांच्या हिताचा कधी विचारच केला नाही. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या व ऊस उत्पादनाचा विचार केल्यास महाराष्ट्रात सर्वाधिक चांगल्या जागी उभा असलेला आदिनाथ आज आधारहीन झाला आहे.
कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्या त्यागातून हा कारखाना उभारला गेला असल्याने याबद्दल सर्वात जास्त सहानभुती व आपुलकी माजी आमदार नारायण पाटील यांना जितकी वाटते तेवढी इतरांना वाटली नाही. यामुळे सहकाराचे हे मंदिर केवळ पैसा उकळण्याचे एक साधन बनले. आज आदिनाथ कोणीतरी भाडेतत्त्वावर चालवण्यास घेत आहे हाच मुळी करमाळा तालुक्यातील सर्व नेतेमंडळींचा पराभव आहे. वास्तविक पाहता अगदी प्रयत्न करुन जर आदिनाथच्या सर्व सभासदांच्या उपस्थितीमध्ये जर कारखाना कार्यस्थळावर वार्षिक सर्वसाधारण सभा झाली तर मात्र सभासदांचा खरा सुर समजला असता.ॲमेझॉनअथवा फ्लिपकार्ट वर आदिनाथ कारखान्याला ऑनलाईन विक्रीस काढले गेले तर नवल वाटायला नको, असा कारभार सत्ताधारी मंडळींकडून चाललेला आहे. आदिनाथ बाबत होणारी दिरंगाई व चालढकलपणा तालुक्यातील सहकार मोडीत काढणारा असून सभासदांच्या हक्क व मालकी अधिकारावर अतिक्रमण करणारा आहे. कोरोनाचा संसर्ग आता कमी झाला असून एखादी सर्वसाधारण सभा कारखानाकार्यस्थळी घेतली जावी व सभासदांना या सभेस हजर राहणे अनिवार्य करुन आदिनाथ कारखान्याबाबत सर्व निर्णयांचा वा ठरावांचा फेरविचार केला जावा. नक्कीच सभासद योग्य तो निर्णय घेतील असा दावा तळेकर यांनी व्यक्त केला.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.