loader
Breaking News
Breaking News
Foto

जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसे यांच्या नेतृत्वाखाली उस वाहतुकदारांचा विराठ मोर्चा

जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील उस वाहतूकदारांचा पंढरपूर येथे विराठ मोर्चा पार पडला.या मोर्चात हजारो वाहनमालक ट्रकट्रर, ट्रक घेवुन सामील झाले होते. या वेळी पोलीसांकडून मोर्चा दडपून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र खुपसे यांनी उग्र रूप धारण करताच पोलीसांना नमस्ते घ्यावे लागले . हजारो शेतकऱ्यांनी पंढरपूर च्या मुख्य चौकातच ठिय्या मांडला. राज्यात पहिल्यांदाच उस वाहतूक करणाऱ्यांसाठी मोर्चा निघाल्याने हा मोर्चा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. राज्यभरातील शेतकरी व उस वाहतूकदार यांच्याकडून या आंदोलनास मिळालेला प्रतिसाद पाहता खुपसे यांची जनशक्ती संघटना राज्यभरात पोहचली असल्याचे देखील सिद्ध झाले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

डिझेलचे दर वाढले, ड्रायव्हरचा पगार वाढला, टायरांची किंमत वाढली तरीही वाहतूक कमिशन मात्र 'जैसे थे' आहे. म्हणून जनशक्ती संघटनेने अतुल खुपसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या ट्रॅक्टर आंदोलनाचा मोर्चा शेकडो ट्रॅक्टरसह पंढरपूर तहसील आवारात पोहचला. मात्र प्रशासन कोणतीच भूमिका घेत नाही अथवा प्रतिसाद देत नसल्याने जनशक्ती च्या कार्यकर्त्यांनी भर पावसात ठिय्या मांडला आहे. पंढरीतल्या या अभूतपूर्व आंदोलनाने पोलीस बांधवांची अचानक तारांबळ उडाली असुन ठोस निर्णय झाल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका जनशक्तीच्या आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने ते रात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालयाच्या गेट समोर बसून होते.याबाबत वृत्त असे की, २०१५-१६ साली डिझेलचे दर ६५ रुपये प्रति लिटर होते आज ते १०० च्या घरात पोहोचले आहे. ड्रायव्हरचा पगार ६ हजार होता तो १५ हजार च्या पुढे झाला आहे. आणि टायर यांच्या किमती देखील वाढल्या आहेत. मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रक चे कारखानदारांनी कमिशन आजही वाढवलेले नाही. शिवाय टोळी करार करण्यासाठी चार ते पाच लाखांचा ऍडव्हान्स कारखानदारांकडून दिला जातो. यामध्ये आपली रक्कम टाकून मुकादमाने सोबत करार करावा लागतो. अशात ही टोळी नाही आलीच किंवा पळून गेली तर याचे सर्वस्वी जबाबदारी ट्रॅक्टर व ट्रक मालकांवर राहते. आणि याचा फटका त्यांना बसतो. असे अनेक घाव सोसल्याने हजारो ऊस वाहतूकदार अडचणीत सापडले आहेत. यामुळे जनशक्ती संघटनेने गावोगावी बैठका घेऊन ट्रॅक्टर आंदोलनाचा इशारा दिला.  या इशाऱ्याकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. दरम्यान आज ठरल्याप्रमाणे जनशक्ती संघटनेने ट्रॅक्टर वाहन मालकांच्या मागण्यांसाठी शेकडो ट्रॅक्टर सह के. बी. पी. कॉलेज चौकातून आंदोलनाला सुरुवात करून सरगम चौक - नवे जुने एसटी स्टँड - सावरकर पुतळा - रेल्वे बोगदा ते तहसील कार्यालय असे आंदोलन केले. आंदोलनानंतर वाहन मालकांनी भाषणे केली. दरम्यान यावेळी प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील बोलण्यास उठले आणि जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही अशी भूमिका घेतली.या भूमिकेला सर्व ट्रॅक्टर मालकांनी पाठिंबा दिला. शिवाय एकही ट्रॅक्टर हलणार नाही अशी ग्वाही दिली व भर पावसात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाला माढा शिवसेना नेते संजय कोकाटे व मोहोळ येथील शिवसेना युवा नेते सोमेश क्षीरसागर भाजप किसान मोर्चाचे माऊली हळणवर यांनी पाठिंबा दर्शविला.  

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

पंढरपूर हे वेगवेगळ्या संघटनांचे आणि आंदोलकांचे सर्व केंद्र बनले आहे. अनेक संघटनांनी वेगवेगळ्या पक्षांनी वेगवेगळी आंदोलने केली. मात्र आज झालेले जनशक्ती संघटनेचे हे आगळेवेगळे आंदोलन असल्याची चर्चा शहरासह तालुक्यात होती. कारण या आंदोलनासाठी शेकडो ट्रॅक्टर व वाहन मालकांचा सहभाग फार तर ट्रॅक्‍टर आंदोलन आहे. आम्ही तहसिलदारांना निवेदन देऊ आम्हाला जाऊ द्या अशी विनंती प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे यांनी पोलीस प्रशासनाला केली. विनंतीनुसार शेकडो ट्रॅक्टर एका रांगेत तहसील कार्यालयाकडे रवाना झाले. मात्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन देऊन दहा दिवस झाले तरी कोणताच प्रतिसाद तहसील व प्रशासनाने दिला नाही. म्हणून वैतागलेल्या आंदोलकांनी पद्धतशीर व शिताफीने सर्व ट्रॅक्टर तहसील कार्यालयाच्या व पोलीस स्टेशनच्या समोर पार्किंग करून घेतले आणि अचानक आम्ही उठणारच नाही असा पवित्रा घेतला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

मच्छिमार बांधवांसाठी उस्मानाबाद जिल्ह्य़ात जावुन अक्रमक आंदोलन करुन मच्छिमार बांधव यांना एका दिवसात न्याय मिळवून दिल्याने अतुल खुपसे यांच्यावरील शेतकऱ्यांचा विश्वास वाढला आहे.अक्रमक ,अभ्यासु व गनिमीकावा पद्धतीत आंदोलन यशस्वी होत असल्याने स्वाभिमानी, रयत, प्रहार या अक्रमक संघटनेत खुपसे यांच्या जनशक्ती संघटनेची भर पडली असुन अल्पावधीतच हि संघटना राज्यभर पोहचु लागली आहे .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts