loader
Breaking News
Breaking News
Foto

वांगी येथे शेतकरी मेळावा संपन्न, जिल्हा बॅंकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

करमाळा तालुक्यातील वांगी नं 3 येथे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी शेतकऱ्यांना बॅंकीग संदर्भात मार्गदर्शन केले व विविध योजनांची माहिती दिली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

रिटेल कर्ज अर्थात व्यवसाय कर्ज योजनेतून उद्योजक मयुर रोकडे यांना वीस लाख रुपये कर्ज मंजूर करण्यात आले या चेक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या वेळी अधीक बोलताना प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी थेट कर्जपुरवठा शेती कर्ज वाटप, , सोनेतारण कर्ज, रिटेलकर्ज, सातबारा, 8अ, 6ड उतारा, मायक्रो ए टी एम इ. बाबत वांगी व पंचक्रोशीतील लोकांना सविस्तर मार्गदर्शन केले तसेच उपस्थितीत्यांच्या प्रश्नांना योग्य ती उत्तरे दिली. मयुर रोकडे यांच्या शिवछत्रपती कृषी अँड सप्लायर्स व्यवसायास स्वतः प्रशासक शैलेश कोथमिरे यांनी भेट दिली व बँकेस एक चांगले कर्जदार मिळाले असे सांगून मयुर रोकडे यांना व्यवसायस शुभेच्छा दिल्या .यावेळी सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे .बँकेचे पालक अधिकारी जयंत पाटील,बँकइन्स्पेक्टर बी बी महाडिक विविध गावचे चेअरमन, सरपंच, पं. स. सदस्य शेतकरी उद्योजक व बँकेतील कर्मचारी उपस्थित होते

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आभार सिनि.बँकइन्स्पेक्टर आवटे यांनी मानले

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts