loader
Breaking News
Breaking News
Foto

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने गौरी गणपती सजावट स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने करमाळा तालुक्यामध्ये गौरी गणपती सजावट स्पर्धा 2021 चे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पर्यावरण पूरक गौरी गणपती सजावट तसेच कोवीडविषयक जनजागृती करणे , नाविन्यपूर्ण संदेश देणे आदी प्रमुख निकष होते. सहभागी स्पर्धकांनी केलेली गौरी गणपतीची सजावट संयोजकांच्या व्हाट्सअपवरती फोटो द्वारे पाठविली होती. सर्व निकषावर उतरणाऱ्या स्पर्धकांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह ,शाल ,गुलाबपुष्प देऊन आज आ. संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात सन्मानित करण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सौ. जयाताई जाधव सदस्य, पंचायत समिती करमाळा यांचे हस्ते उत्तेजनार्थ , प्रथम, द्वितीय,तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक - सौ.सविता हनुमंत जाधव , द्वितीय क्रमांक - सौ. वर्षा किरण अंधारे ,तृतीय क्रमांक - सौ.प्रतिभा समाधान दौंड ,उत्तेजनार्थ कु. निकिता सुरवडे , सौ आरती वनारसे , सौ मनीषा वनारसे यांना सन्मानित करण्यात आले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष सौ. शितल शिरसागर , कोषाध्यक्ष कु. स्नेहल अवचर , तालुका उपाध्यक्ष सौ रुपाली अंधारे , राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष सौ राजश्री कांबळे , राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्ष सौ नंदिनी लुंगारे , सुजित तात्या बागल, मानसिंग भैय्या खंडागळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शितल क्षीरसागर यांनी केले ,आभार सुजित तात्या बागल यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. विकास वीर यांनी केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts