loader
Breaking News
Breaking News
Foto

एडव्होकोट नानासाहेब घाडगे यांच्या आठवणींतुन मला कायम समाजसेवेची शिकवण मिळत राहील - नारायण आबा पाटील

एडव्होकोट नानासाहेब घाडगे यांच्या आठवणींतुन मला कायम समाजसेवेची शिकवण मिळत राहील असा भावपूर्ण आशावाद माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केला. तरटगाव येथे स्व. अॅडव्होकेट नानासाहेब घाडगे यांच्या प्रथमपुण्यस्मरण दिनाचे वेळी श्रध्दासुमन वाहताना त्यांनी हि प्रतिक्रिया दिली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

तरटगाव येथील अॅड नानासाहेब घाडगे यांच्या अकाली निधनास आज एक वर्ष पुर्ण झाल्याने त्यांच्या कुटूंबियांच्या वतीने एका स्मृतीसोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार नारायण पाटील यांनी डाॅ अमोल घाडगे व कुटूंबियांची प्रत्यक्ष भेट घेऊन स्व घाडगे वकील यांच्या प्रति आपला आदरभाव व्यक्त केला. यावेळी त्यांचे समवेत जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,सभापती अतूल पाटील पुर्व भागाचे नेते अजित तळेकर, गोपाळदादा मंगवडे, पाटील गटाचे मार्गदर्शक प्रा अर्जूनराव सरक, प्रवक्ते सुनील तळेकर आदि उपस्थित होते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

स्व घाडगे वकील साहेब यांच्या आठवणींना उजाळा देताना पाटील म्हणाले की सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांचा विश्वास संपादन केलेल्या घाडगे कुटूंबाचे करमाळा तालूक्याच्या सहकारक्षेत्रातील विकासात फार मोठे योगदान आहे. स्व अॅड नानासाहेब घाडगे यांनी आपला व्यावसाय सांभाळत असताना तालुक्यातील महत्वाच्या प्रश्नांची सोडवणुक करण्यासाठी वेळ दिला. सामाजिक कामात आपला सहभाग सतत नोंदवला व माणसं कमविण्याचे अनमोल कार्य केले. घाडगे वकील यांनी घालून दिलेला आदर्श आज डाॅ अमोल घाडगे यांच्या बरोबर आम्हासही प्रेरणादायी असणार आहे. घाडगे वकील यांना या जन्मात तरी विसरणं अशक्य असल्याचे भावपूर्ण मत माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केले.तर पाटील व घाडगे कुटुंबाचे ऋणाणूबंध असेच पुढील पिढीतही कायम राहतील असे ही माजी आमदार नारायण पाटील यांनी म्हटले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

डाॅ अमोल घाडगे यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभा असुन त्यांना प्रेम आपुलकी व साथ याची कमतरता भासू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts