नरेंद्र मोदी यांचे विचार घराघरापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी कार्यकर्त्यांना केले .काल भारतीय जनता पार्टी च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते त्या वेळी ते बोलत होते.
भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र भाई मोदी यांच्या 17 सप्टेंबर रोजी असणाऱ्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यामध्ये ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रम तालुका अध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले , मौजे देवळाली येथे वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला तसेच विट येथे देखील माध्यमिक विद्यालयाच्या आवारामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली ,मांगी येथे कीटकनाशक फवारणी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा आवार स्वच्छ करण्यात आला ,सदर प्रसंगी तालुका अध्यक्ष गणेश चिवटे , तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे ,राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार ,किरण बागल ,प्रकाश ननवरे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते, देवळाली येथे बोलताना तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी सर्व कार्यकर्त्यांना पंतप्रधान यांचा आदर्श व त्याग डोळ्यासमोर ठेवून काम करावे व भाजपाचे कमळ घराघरात पोहोचवा असा संदेश दिला, यावेळी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड ,ओबीसी मोर्चा सरचिटणीस भैय्याराजे गोसावी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
विट येथे वृक्षारोपण प्रसंगी विस्तारक भगवानगिरी गोसावी यांनी भाजपा ही संघटना आहे की जी सर्व स्तरातील कार्यकर्त्यांना बळ देते याचे जिवंत उदाहरण म्हणजे मा,पंतप्रधान आहेत ही संघटना घराणेशाहीला कधीच खतपाणी घालत नाही असे आवर्जून सांगितले , यावेळी तालुका चिटणीस अशोक ढेरे , युवा मोर्चा उपाध्यक्ष हर्षद गाडे, भाऊसाहेब मेहेर ,दत्तात्रय गाडे, समाधान पवार ,अंकुश बरडे, अश्रू कांबळे अश्रू कांबळे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते , वरकटणे येथे शालेय विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप कार्यक्रम तालुका उपाध्यक्ष दादासाहेब देवकर, सरपंच बापूसाहेब तनपुरे ,ग्रामपंचायत सदस्य मनोहर देवकर ,प्रताप देवकर ,प्रशांत पाटील ,भागवत तनपुरे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला, व रायगाव येथे अबालवृद्धांना फळे वाटप व माजी सैनिकांचा सत्कार असा कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रम किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष विजयकुमार नागवडे व सरपंच दादासाहेब जाधव, मकाई चे संचालक बरडे सर, देविदास बरडे, नानासो जाधव ,शहाजी बुधवंत, लक्ष्मण शिंदे ,माजी सरपंच दादा कांबळे व अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला, तसेच करंजे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात व गावात वृक्षारोपण कार्यक्रम तालुका संघटन सरचिटणीस काकासाहेब सरडे व युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सागर सरडे व अन्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला ,तसेच खडकी येथे माजी सरचिटणीस मोहन शिंदे व गणेश गोसावी यांच्या हस्ते वृक्षारोपण वाटप कार्यक्रम पार पडला
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.