शिवसेना उपनेते आमदार तानाजीराव सावंत व जिल्हा समन्वयक प्रा शिवाजीराव सावंत यांच्या विरोधात शिवसेनेचे पदाधिकारीच आंदोलन करणार असल्याने सोलापूर शिवसेनेत खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वरिष्ठ लक्ष घालणार का असा सवाल आता विचारला जात आहे.
तानाजीराव सावंत व शिवाजीराव सावंत यांच्या भैरवनाथ शुगर या साखर कारखान्या विरोधात हे आंदोलन होणार असून शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी हे आंदोलन जाहीर केले आहे या बाबत मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.यात म्हटले आहे की भैरवनाथ शुगर विहाळ ता करमाळा या कारखान्याने सन 2018 19 मध्ये अनेक शेतकऱ्यांची 266 रुपये प्रमाणे अंतिम बिल दिले नाही त्याचबरोबर अनेक वाहनधारकांच्या नावावर त्यांच्या परस्पर काढलेले कर्ज प्रकरणी कारखान्याची चौकशी व्हावी तसेच शेअरच्या रकमा परत मिळाव्यात असे म्हटले आहे.
भैरवनाथ शुगर या कारखान्याने सन 2018 19 मध्ये उसाला 2200 रुपये भाव देतो असे आश्वासन दिले वृत्तपत्रातून तसा बातम्या प्रसिद्ध केल्या गाळप सुरू झाल्यानंतर दोन महिने उसाला 2200 भाव दिला मात्र नंतर शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ चालू केले अजूनही जवळपास दीड लाख मेट्रिक टन उसाचे प्रति टन 266 रुपया ने शेतकऱ्यांचे पैसे काढून ठेवले आहेत या पैशाला दोन वर्षे उलटून गेली तरी कारखाना प्रशासन शेतकऱ्याला दाद देत नाही दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना प्रचंड पैशाची गरज आहे कारखान्याचे चेअरमन शिवसेना उपनेते आमदार तानाजी सावंत शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहेत तसेच या कारखान्याने अनेक वाहनधारकांच्या नावावर शेतकर्यांच्या परस्पर लाखो रुपयांचे कर्ज काढले आहे हे कर्ज थकीत झाल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या सातबारा उतारा वर बँकेचे नाव लागले असून संबंधित बँका वसुलीसाठी शेतकऱ्यांना त्रास देत आहेत शेतकऱ्यांची थकबाकीमुळे पण खराब झाल्यामुळे त्यांना पिक कर्ज याबाबत अन्यायग्रस्त शेतकरी कारखान्यावर विचारपूस करण्यासाठी गेल्यास त्यांना कर्मचाऱ्या कडून कारखान्याच्या गेटवर हाकलून दिले जाते त्याच प्रमाणे गेली दहा वर्षापासून शेअर्स म्हणून प्रत्येकी शेतकऱ्याकडून वीस हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत या रकमेला हा कारखाना व्याज देत नाही किंवा लाभांश देत नाही व ही रक्कम परत मागण्यास गेल्यास शेतकऱ्याला हुसकून लावले जाते या सर्व प्रकरणाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने हे आंदोलन करीत असल्याचे या पत्रात म्हटले आहे
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.