loader
Breaking News
Breaking News
Foto

पवारसाहेबांच्या उपस्थित कुकडी संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न, मांगी तलावात कायमस्वरूपी पाणी आण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांची आग्रही मागणी

माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक16/09/2021रोजी मुंबई येथे सहयाद्री अतिथीगृहावर कुकडी प्रकल्प समूहाच्या सिंचन अडचणी व त्यावरील उपाय योजना साठी महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत कुकडी प्रकल्प समूहाच्या येडगाव,वडूज,पिंपळगाव जोगे,डिंबे,माणिकडोह या प्रकल्पाच्या सिंचन अडचणी व नव्याने पाणी उपलब्ध करण्यासाठी व घाटावरील पाणी वळवून ह्या प्रकल्पामध्ये पाणी वाढ करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत मांगी तलावात जास्तीतजास्त पाणी आण्यासाठी आग्रही मागणी केली. केली असुन डिंबे ते माणिकडोह या महत्त्वपूर्ण बोगद्याच्या कामासाठी केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिलेली आहे आशी माहिती करमाळा माढा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी सा करमाळा चौफेर शी बोलताना दिली आहे. .राज्यातील तांत्रिक सल्लागार समितीची बैठका या विषयावरती झालेल्या आहेत. परंतु हा विषय अद्यापही प्रलंबित आहे. हा बोगदा झाल्यास पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा या तालुक्यांना हक्काचे पाणी मिळण्यास मदत होणार आहे. या महत्वपूर्ण विषयावरही या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी या वेळी सांगीतले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मांगी तलावामध्ये जास्तीत जास्त पाणी येण्यासाठी व तेथील जास्तीत जास्त क्षेत्र सिचन खाली येण्यासाठी ज्या मागण्या केल्या आहेत त्या मागण्यावर अभ्यास करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असुन पुढील बैठकीस अभ्यास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे देखील सांगण्यात आले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब, जलसंपदामंत्री जयंतराव पाटील साहेब,गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब,आमदार संजयमामा शिंदे,आमदार रोहित दादा पवार, आमदार अशोक बापू पवार,आमदार निलेश लंके,आमदार अतुल बेनके,जलसंपदा प्रधान सचिव विजय गौतम ,कृष्णा खोरे कार्यकारी संचालक विलास राजपूत,कुकडी मुख्य अभियंता धुमाळ साहेब आदीजण उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून दहिगाव योजनेस मिळालेली सुप्रमा त्यांनतर मांगी तलावात कुकडीचे पाणी आण्यासाठी बंदिस्त पाईपलाईनचा दिलेला प्रस्ताव तसेच प्रलंबित एमआयडीसी काम सुरु केल्याने नागरिकांकडून आमदार शिंदे यांच्या कामाचे कौतुक होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts