loader
Breaking News
Breaking News
Foto

खडतर परिस्थितीत सागर फरतडे याने मिळवली एलएलबी डिग्री, बार कौन्सिल ची देखील परिक्षा पास.

हिवरे येथील शेतकरी कुटुंबातील सागर मच्छिंद्र फरतडे या युवकांने खडतर परिस्थितीत मार्ग काढत एलएलबी ची डिग्री मिळवली असुन बार कौन्सिल ची परिक्षा पासा झाला आहे. महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल चे प्रमाणपत्र (सनद) मिळाल्याने सागर याचे वकिल होण्याचे स्वप्न पुर्ण झाले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सागर याचे प्राथमिक शिक्षण हिवरे येथील जिल्हा परिषद शाळेत झाले असून आठवी ते दहावीपर्यंत चे माध्यमिक शिक्षण आण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा येथे झाले आहे. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा येथे बि कॉम तर सावित्रीबाई फुले पुणे युनिवर्सिटी येथे एम काॅम चे शिक्षण पुर्ण केले.त्यानंतर राजर्षी शाहु महाराज लाॅ कॉलेज बार्शी येथे एलएलबी चे शिक्षण पुर्ण केले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

वकिलीची सनद मिळवणारा सागर फरतडे हा हिवरे गावातील पहिलाच युवक ठरला असल्याने ग्रामस्थांकडून अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts