माजी आमदार नारायण पाटील यांनी आज माढा तालुक्यातील चिंचगाव टेकडी येथील परमपूज्य रामानंद सरस्वती महाराज यांना प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन श्रध्दांजली वाहिली असल्याची माहिती पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी करमाळा चौफेर ला दिली.
माढा तालुक्यातील चिंचगाव टेकडी येथील दिव्य व आध्यात्मिक अनुभुती असलेले परमपूज्य रामानंद सरस्वती महाराज यांचे वयाच्या 96 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. मा आ. पाटील यांनी श्रध्दांजली वाहून आपले भाव व्यक्त केले. याबाबत अधिक माहिती देताना तळेकर यांनी सांगितले रामानंद सरस्वती महाराज यांचे वर माजी आमदार नारायण पाटील यांची खुप श्रध्दा असून माढा तालुक्यातील 36 गावांमथ्ये जेंव्हा जेंव्हा मा. आ .पाटील राजकीय कार्यक्रम अथवा विकासकामांनिमित्त जात असत तेंव्हा ते महाराजांची भेट अवश्य घेत असत. केवळ राजकीय कामानिमित्तच नव्हे तर इतर वेळीही खास वेळ काढून मा आ पाटील यांनी चिंचगाव टेकडीस भेटी दिल्या आहेत.
सन 2014 ते 2019 दरम्यान आमदार म्हणून काम करत असताना चिंचगाव टेकडी देवस्थान विकासासाठी मा आ पाटील यांनी दोन कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला होता.महाराजांच्या मानवी देह त्यागून वैकुंठ जाण्याने सोलापुर जिल्हा अथवा महाराष्ट्र नव्हे तर इतर राज्यातील धार्मिक भक्तांवर दुःखाचे पहाड कोसळले असून धार्मिक क्षेत्रातील हि घटना मला तरी पोरकी करुन गेली या शब्दात मा आ पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.