loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष पदी फिसरे येथील सुनील नेटके यांची निवड

करमाळा भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची पाळेमुळे ग्रामीण भागापर्यंत पोहचु लागली आहेत. "गाव तेथे शाखा घर तेथे कार्यकर्ता " हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून गणेश चिवटे यांची वाटचाल सुरु असुन राजकारणा बरोबरच युवकांच्या हाताला काम देणारा नेता म्हणून गणेश चिवटे यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे काम करणाऱ्या युवकांची संख्या वाढत असून शेकडो युवक भाजपाच्या प्रवाहात सामील होत आहेत .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

आज फिसरे येथील युवा कार्यकर्ते सुनील नेटके यांची शेकडो युवकांच्या उपस्थित गणेश चिवटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवुन भाजपा युवा मोर्चाच्या तालुका उपाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली.या वेळी युवा मोर्चा च्या माध्यमातून भाजपाचे व नरेंद्र मोदी यांचे विचार युवकांपर्यंत पोहचवण्यासठी काम करणार असल्याचे सुनील नेटके यांनी सांगितले. यावेळी बोलतना तालुकाध्यक्ष गणेश चिवटे म्हणाले की भारतीय जनता पार्टीचा विस्तार व ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम आपल्या हातून व्हावे तसेच आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांचे विचार आत्मसात करून संघटना बांधणी करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यावेळी ज्येष्ठ नेते संजय अण्णा घोरपडे यावेळी ओबीसी मोर्चा तालुका अध्यक्ष धर्मराज नाळे उपाध्यक्ष भैयाराजे गोसावी, फिसरेचे उपसरपंच संदीप भाऊ नेटके , दिलीप पाटील, मोहन नेटके ,कांतीलाल कणसे ,सुनील नेटके, राजेंद्र गायकवाड, रामभाऊ खंडागळे, सुंदर नेटके, लक्ष्मण कणसे ,भाऊ नेटके ,नामदेव नेटके, उत्तरेश्वर नेटके, बालाजी नेटके, शिवाजी नेटके ,निखील नेटके ,नितीन नेटके ,हनुमंत नेटके ,रवींद्र कणसे, विनोद नेटके उपस्थित होते,

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात सामिल होत असलेल्या युवकांचा आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत फायदा होऊ शकतो .

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts