loader
Breaking News
Breaking News
Foto

विनाकारण खोट्या तक्रारी दाखल होऊ नयेत यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनातुन गाव पातळीवर ग्राम सुरक्षा दल स्थापन केले आहे- सुर्यकांत कोकणे

विनाकारण खोट्या तक्रारी दाखल होऊ नयेत यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनातुन गाव पातळीवर ग्राम सुरक्षा दल स्थापन केले आहे अशी माहिती पोलिस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांनी दिली. ते अथर्व मंगल कार्यालय करमाळा येथे झालेल्या ग्रामसुरक्षा दल स्थापना व मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते. करमाळा पोलीस ठाणे यांच्या वतीने आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल हिरे, यांच्या मार्गदर्शनातुन हा मेळावा पार पडला .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालकश्री डि .के गोर्डे, नायब तहसीलदार जाधव साहेब, गट विकास अधिकारी भोंग साहेब, करमाळा नगर परिषद करमाळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिनिधी देशमुख साहेब हे व करमाळा तालुक्यातील 118 गावातील व 95 ग्रामपंचायत मधील पोलीस पाटील , सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, उपस्थित होते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

करमाळा तालुक्यातील गावामध्ये ग्रामसुरक्षा दल स्थापन करून ग्रामसुरक्षा दलाची सदस्यांनी त्यांच्या गावातील चोरी, दरोडे, महिला विषयी गुन्हे घडणार नाही, पूर परिस्थिती, अवैध धंदे करणारे यांना त्या धंद्या पासून परावृत्त करण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते मॅडम यांनी नियोजन केले" ऑपरेशन परिवर्तन" व ग्रामसुरक्षा दलाची कामकाजा विषयी माननीय सूर्यकांत कोकणे यांनी माहिती दिली.अधिक माहिती देताना कोकणे म्हणाले की ,कायदा व सुव्यवस्था बिघडवणारे , गुन्हे करणारे, गुन्ह्यास प्रवृत्त करणारे या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, पोलीस खाते हे जनतेच्या रक्षणासाठी आहे,विनाकारण खोट्या तक्रारी दाखल होऊ नयेत यासाठी गाव पातळीवर ग्राम सुरक्षा दल स्थापन केले आहे, असे सांगून त्यांनी कोणाच्या काही अडचणी असल्यास तात्काळ संपर्क करणे विषयी आव्हान केले

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

पोलीस पाटील व सरपंच यांचा कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी उपस्थित संख्या पाहून असा कार्यक्रम कधीच झाला नाही, यापूर्वीचे अधिकारी होते परंतु जनमानसात मिसळत नव्हते, जनतेसाठी काम करणारे फक्त सूर्यकांत कोकणे हेच आहेत, मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी चर्चा पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, व कार्यक्रमास आलेली लोकांत चर्चा चालू होती, यावेळी ग्रामसुरक्षा दलाची करमाळा तालुक्याचे नोडल अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक साने साहेब व किरण पवार साहेब यांनी सूत्रसंचालन व नियोजन केले होते. कार्यक्रम करिता पाचशे ते सहाशे लोक उपस्थित होते पोलीस खात्याने देखील कोरोना संदर्भात दक्षता घेण्यासाठी कार्यक्रम स्थळी उपाय योजना केली होती

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts