loader
Breaking News
Breaking News
Foto

वांगी ३ गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीला संरक्षण कठडा व जाळी बसवण्याची राष्ट्रवादीची मागणी

वांगी नंबर ३ गावाला पिण्याचा पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहीरीवर (आडावर) योग्य त्या उंचीचा कठाडा नसल्याकारणाने पावसाळ्यात मोठा पाऊस झाला असता गावातील पावसाचे वाहून आलेले गढूळ पाणी या विहीरीमध्ये जाऊन विहीरीतील पिण्याचे पाणी दूषित होत असते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

तसेच ३-४ दिवसांपूर्वीच या विहीरीमध्ये मांजर पडून मृत्यू पावल्याने हे पाणी पुढील ४-५ दिवस पिण्यायोग्य स्थितीत नव्हते. भविष्यात या सर्व घटना टाळण्यासाठी विहीरीला योग्य त्या उंचीचा कठाडा बांधून विहीरीच्या वरील बाजूला जाळीचे आच्छादन तात्काळ बसविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी पदवीधर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सोमनाथ खराडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पुणे शहर सरचिटणीस सौ. निता सोमनाथ खराडे, राष्ट्रवादीच्या चित्रपट, कला व सांस्कृतिक विभागाचे करमाळा तालुकाध्यक्ष बाळू कारंडे, बंडू सुतार सर यांनी केली आहे.

वांगी ग्रामपंचायतीने वांगी नं. ३ येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीला तात्काळ योग्य त्या उंचीचा कठाडा बांधून वरून जाळी बसवून घ्यावी, अन्यथा पिण्याच्या पाण्यामधून गावात काही अपायकारक घटना घडल्यास त्याला सर्वस्वी ग्रामपंचायत प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल. सोमनाथ बाळासाहेब खराडे (प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर सेल)

शंभुराजे फरतडे ✍

सदर मागणी बाबतचे लेखी निवेदन वांगी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक तांबोळी भाऊसाहेब, गटविकास अधिकारी पंचायत समिती करमाळा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना देण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts