loader
Breaking News
Breaking News
Foto

स्व दादासाहेब जगताप यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्त हिवरे येथे ६५ जणांचे रक्तदान

हिवरे येथील माजी उपसरपंच मोतीराम जगताप यांचे जेष्ठ चिरंजीव दादासाहेब जगताप यांचे गेल्यावर्षी अल्पशा आजाराने वयाच्या ४२ व्या वर्षी निधन झाले होते. स्व दादासाहेब जगताप यांचे वडील व भाऊ जरी राजकारणात सक्रिय आसले तरी संपूर्ण जगताप परिवार गावातील धार्मिक कार्यात हिरारीने सहभाग घेयचे . तसेच सर्व जाती धर्मातील लोकांच्या सुखदुःखात सहभागी असायचे .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मात्र मोतीराम जगताप यांच्या मुलाचे ऐन उमेदीत असताना निधन झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती,स्व दादासाहेब हे निर्व्यसनी, शांत व मितभाषी होते गावातील लहानाथोरांशी त्यांचा सवांद होता.त्यामुळे सर्वांना प्रंचड दुख झाले होते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिना निमित्त फक्त एक दिवसात अचानक ठरलेले नियोजन असताना देखील ६५ जणांनी रक्तदान करुन स्व दादासाहेब यांच्या स्मृतीस अभिवादन केले.रक्तदान शिबिराचे उद्घाटन ह भ प चंद्रभान महाराज यांनी केले.बार्शी येथील भगवंत बल्ड बॅंकेने रक्त संकलन करण्याचे काम केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

रक्तदानासाठी ग्रामपंचायत, शिवप्रताप सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,सर्व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts