loader
Breaking News
Breaking News
Foto

माजी आमदार नारायण पाटील यांच्या धार्मिक असण्याच्या भुमिकेमागे पाटील गट भक्कमपणे उभा - पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर

माजी आमदार नारायण पाटील यांच्या धार्मिक असण्याच्या भुमिकेमागे पाटील गट भक्कमपणे उभा असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी सांगितले. करमाळा तालूक्यातील बाळूमामा भक्त मनोहर महाराज यांच्या विरोधात झालेल्या तक्रारीवरुन तालुक्यात चर्चांना उधाण आले असून माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रतिक्रियेवरुन विरोधकांनी सोशल मिडीयावर टीकास्त्र सोडले आहे. या पार्श्वभूमीवर आज पाटील गटाच्या वतीने स्पष्टीकरण देण्यात आले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

यावेळी बोलताना तळेकर म्हणाले की, माजी आमदार नारायण पाटील यांनी आजपर्यंत अनेक धार्मिक कामात आपला सहभाग नोंदवला आहे. सन 2014 ते 2019 या दरम्यान आमदार म्हणून काम करत असताना श्री कमलाभवानी मंदीर विकासास 1 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन आणला. आवाटी येथील वलीबाबा दर्गा विकासासाठी 1 कोटी 56 लाख रुपयांचा विकास निधी मंजूर करुन दिला. तसेच चिंचगावटेकडी देवस्थान (माढा) 2 कोटी रुपयांचा निधी दिला.यासह श्री आदिनाथ मंदिर(संगोबा), कोटलींगनाथ मंदिर चिखलठाण, शनेश्वर महाराज (पोथरे), श्री उत्तरेश्वर देवस्थान (केम) किर्तेश्वर मंदिर (केतूर) आदि अनेक महत्त्वाच्या तिर्थक्षेत्रांना अ दर्जा मिळावा म्हणून प्रस्ताव देऊन पाठपुरावा केला.

मनोहरमामा व आमदार संजयमामा यांच्या भेटीचे फोटो देखील आज पाटील गटाकडून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

आमदार स्थानिक विकास निधीतून करमाळा मतदार संघात जवळपास 200 सभामंडप बांधून दिले. लव्हे ता करमाळा येथे श्री आनंदयोगी महाराज यांच्या साठी माँ शारदाश्रम बांधून दिला. जेऊर येथील अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. स्वामी आनंदयोगी महाराज हे स्वामी विवेकानंद व रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांचे गाढे अभ्यासक होते व त्यांच्या सानिध्यात पाटील यांनी अनेक धार्मिक व समाजास प्रबोधन करणारे कार्यक्रम आयोजित केले. यामुळे माजी आमदार पाटील यांच्या धार्मिक असण्याला संपुर्ण पाटील गटाचा पाठींबा असून श्री बाळूमामा व स्वामी आनंदयोगी महाराज यांच्या वर श्रध्दा ठेवणे ही बाब विरोधकांना मात्र चुकीची का वाटत आहे? मनोहर महाराज यांच्या सानिध्यात तर विद्यमान आमदार संजयमामा शिंदे सुद्धा आले होते. आम्ही अंधश्रद्धा अथवा मनोहर महाराज यांच्या विरोधात असलेल्या तक्रारीबाबत कसलाही आक्षेप घेत नाही.ज्यां तक्रारदारांना महाराजांनी आपल्यास फसवले आहे अथवा गैर कृत्य केले आहे असे वाटून जर तक्रार दिलेली असेल तर त्यांनाही जरुर न्याय मिळावा. हे कायद्याचे राज्य असून न्यायाची मागणी करणे हा हक्क त्यांना घटनेनेच दिला आहे. आज माढा तालुक्यातील आतकर व कुलकर्णी कुटुंबही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. न्यायदेवतेवर आमचा विश्वास असुन सत्य जे असेल त्यास न्याय मिळणारच आहे. परंतु तोपर्यंत विरोधकांकडून मात्र मा आ पाटील यांच्या भुमिकेवर आरोपसत्र चालू आहे हे मान्य नाही. असे देखील तळेकर यांनी स्पष्ट केले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

मयत शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढून फसवण्याचा प्रकार हा सुध्दा पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाराच प्रकार असल्याचे पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी शेवटी सांगितले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts