loader
Breaking News
Breaking News
Foto

एन पी इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीला दणका द्यावाच लागेल एका रस्त्यासाठी लावली चार रस्त्यांची वाट! प्रशासनाची भुमिका बघ्याची.

महाराष्ट्र राज्य महामार्ग क्रमांक 68 साखळी क्रमांक 137/260ते 189 या कोर्टी ते आवाटी पर्यंत च्या रस्त्याचे करमाळा नगरपालीका हद्द सोडून दोनपदरी करण्याचे काम सुरु आहे. या कामाची वर्कऑर्डर 23/9/2020 ला निघाली असून 24 महिन्यात हे काम पुर्ण करण्याची अट आहे. रस्ता रुंदीकरण व दुरुस्ती च्या कामासाठी लागणाऱ्या खडी ची व मुरुमाची मोठ्या टिपर द्वारे ओव्हर लोड वाहतूक सुरु आहे .क्षमतेपेक्षा जास्त लोड भरला जात असल्याने गुळसडी,ते सौंदे,सौंदे ते साडे,साडे ते सालसे,शेलगाव ते अर्जुनगर या करोडे रुपयांच्या रस्त्याची अक्षरशः वाट लागली असून सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, तहसीलदार आरटीओ यांचे या गंभीर प्रकरणाकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने जनमानसात प्रशसाना बद्दल उलट सुलट चर्चा सुरु आहे.एकतर ग्रामीण भागात दहा दहा वर्षे रस्ते होत नाहीत झाले तरी निकृष्ट कामामुळे जास्त दिवस टिकत नाहीत त्यात एन पी कन्स्ट्रक्शन कंपनीकडून सुरु असलेल्या ओव्हर लोड वाहतूक मुळे मुदतीच्या आत सर्व रस्ते उखडून गेले असल्याने जनमानसात रोष असून गुळसडी,सौंदे,शेलगाव, अर्जुनगर, सालसे,साडे या ठिकानचे नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत असून या मुजोर कंपनीला दणका देण्याच्या तयारीत आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

शेलगाव व सौंदे येथे माळढोक क्षेत्र असून देखील खडी क्रशर व डांबर निर्मीती प्लॅन्ट ला मंजुरी दिली असून या मध्ये देखील आर्थिक तडजोडी झाल्या असल्याची चर्चा आहे. प्रदूषण व धुळीचे कोणतेही नियम पाळले जात नाहीत धुळी पासुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याऐवजी दमदाटी केली जात आहे.पुलाच्या कामांसाठी लोखंड कट करण्यासाठी वेल्डिंग साठी चोरुन विज वापरली जात आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

रस्त्याचे व साईड गटारीचे काम निकृष्ट संथ गतीने चालु आहे ,एक साईडला रस्ता उखडून ठेवला असून दुसऱ्या बाजुस ओव्हर लोड वाहतूक मुळे खचुन गेला असल्याने ओव्हर टेक करताना तसेच दोन वाहने एका वेळी आल्यानंतर अपघास निमंत्रण ठरत आहे.परवा सालसे येथे एक ट्रक रुतुन बसला होता तर आज एक ट्रक पलटी झाला आहे.सुदैवाने यात जिवितहानी झालेली नाही.फिसरे येथे पुलाचे काम सुरु होणार असून बाजुने काढलेला बायपास काळ्या मतीने तयार करून त्यावर मुरुम टाकलेला आहे.पावसाळ्यात या पुलाखालून मोठ्यावेगाने पाणी वाहते पुलाला पोहचायला फक्त फुट आर्धाफुट कमी असते.आशा परिस्थितीत मोठा पाऊस झाला तर बाजुने काढलेला बायपास एका दिवसात वाहुन जावु शकतो या कडे प्रशासने लक्ष द्यावे मातीने केलेला भराव काढून पक्या मुरुमात तो तयार करावा अन्यथा भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

जवळपास एक वर्षांपासून हे काम सुरु असुन संपुर्ण उन्हाळ्यात या रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने नागरींकाना प्रचंड त्रास सहन करावा लागला .या नंतर रस्त्यावर असलेले खड्डे मातीने बुजवल्याने पावसाळ्यात सर्वत्र चिखल होवुन अनेक जण दुचाकीवरुन पडुन किरकोळ जखमी झाले आहेत. सध्या या रस्त्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून हा रस्ता अपघातस निमंत्रण ठरत आहे.हा सर्व प्रकार संबंधित प्रशासन मात्र का गांभीर्याने घेत नाही हे सर्व सामान्य जनतेला पडलेले कोडे आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts