loader
Breaking News
Breaking News
Foto

बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या विरोधात व्यापारी असोसिएशनची तक्रार

करमाळा तालुक्यातील केम येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतील व्यवहार तांत्रिक अडचणी मुळे दोन दिवसांपासून ठप्प आहेत. ऐन सणासुदीच्या काळात बॅंक बंद राहणार असल्याने ग्राहकांतून बॅंकेच्या कामकाजा विषयी नाराजी निर्माण झाली असुन केम येथील व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष सागर दोंड यांनी बॅंकेच्या पुणे येथील हेडऑफीस ला तक्रार केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या तक्रारीत दोंड यांनी म्हटले आहे की केवळ सर्व्हर बंद आहे कारण करुन सर्व व्यवहार बंद करणे पुर्ण चुकिचे असुन बॅंकेच्या हलगर्जीपणा मुळे सणासुदीच्या काळात ग्राहकांवर उसनवारी ची वेळ आली आहे. पंचक्रोशीत एकमेव बॅंक असल्याने आजूबाजूस असलेल्या चार ते पाच गावातील नागरिक या बॅंकेचे खातेदार आहेत.यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या दुधाच्या पगारी देखील अडकून पडल्या आहेत. त्याचबरोबर अनेक लोकांचे रुग्ण दवाखान्यात आहेत त्यांना उपचारांसाठी पैशाची अत्यंत गरज आहे .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

त्याच बरोबर बॅंकेतील कर्मचारी विचारपूस करण्यास गेलेल्या ग्राहकांना अरेरावीची व उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे देखील दोंड यांनी तक्रारीत म्हटले असून तात्काळ व्यवहार सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

अन्यथा बॅंक समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts