loader
Breaking News
Breaking News
Foto

शुभम बंडगर यांची अ.भा.वि.प च्या जिल्हासंयोजक पदी निवड

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जिल्हा संयोजक पदी ढोकरी, तालुका करमाळा येथील शुभम बंडगर यांची निवड करण्यात आली आहे.बार्शी येथे झालेल्या प्रदेश अभ्यास दौरा कार्यक्रमा दरम्यान बंडगर यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या पुर्वी शुभम बंडगर यांनी महाविद्यालय अध्यक्ष, दोन वर्ष जिल्हा सहसंयोजक व प्रदेश कार्यकारणी वर सदस्य म्हणून काम पाहिले आहे. या निवडी प्रसंगी राष्ट्रीय संघटण मंत्री आशिष चौहाण , राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत साठे , क्षेत्रीय संघटन मंत्री देवदत्त जोशी , प्रदेशाध्यक्ष सारंग जोशी , पश्चिम क्षेत्र सहसंघटन मंत्री रायसिंह जी , प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे हे उपस्तिथ होते .तसेच या अभ्यास वर्गात महाराष्ट्रातुन १७ जिल्ह्यातुन अपेक्षित विद्यार्थी कार्यकर्ते उपस्तिथ होते . या कार्यक्रमाचा समारोप प्रदेश संघटण मंत्री अभिजित पाटील यांनी केला .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

निवडीनंतर करमाळा चौफेर शी बोलताना शुभम बंडगर म्हणाले की या पुर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून अनेक आंदोलने करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवले असुन ,भविष्यात विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तसेच शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी परिषेदेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे सांगीतले. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य करुन घेणार आहोत असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला .प्रदेश सहमंत्री नागसेन पुंडके यांनी बंडगर यांचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. शुभम बंडगर हे बाजार समिती चे सभापती शिवाजीराव बंडगर यांचे चिरंजीव आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

शुभम बंडगर हे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समीतीचे सभापती प्रा शिवाजीराव बंडगर यांचे चिरंजीव आहेत.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts