loader
Breaking News
Breaking News
Foto

विकाल गुटखा तर खाल फटका? घ्याल मटका तर बसेल झटका? मुख्य सूत्रधारां पर्यंत कोकणे साहेब पोहचणारच!

पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी करमाळा पोलीस ठाण्याचा पदभार स्विकाराल्या पासुन ग्रामीण भागातील चोरी चुपे दारु ,गुटखा विकणाऱ्यांची झोप उडाली आहे.दोन पथके तैनात करून प्रत्येक गावातील छोट्या पान टपऱ्या, हातभट्टी दारु विक्रते ,गल्ली बोळात मटका घेणारे पत्त्यांचे कल्ब चालवणारे यांच्या वर धाडी टाकून त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

अवैध धंद्या विरोधातील मोहीमेत फक्त पोलीस कर्मचारीच नाही, तर स्वतः पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आघाडीवर असल्याने हि मोहिम अधिकच तीव्र झाली आहे. आपल्या समवेत अनुभवी पोलिसांचे पथक घेऊन स्वतः कोकणे साहेब धाडी साठी अवैध धंद्याच्या स्पाॅट वर जात असल्याने गावपुढार्यांकडुन होणाऱ्या तडजोडी थांबल्या आहेत व गुटखा ,मटका धंदेवाल्यांना थेट जेलवारी चा लाभ होत आहे. परवा पासुन गणेश उत्सव सुरु होत असल्याने अवैध व्यवसायीक यांचा किमान नऊ दिवसांचा मुक्काम वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.एखाद्या धाड पथकांचे नेतृत्व पोलीस निरीक्षक यांनी करण्याची तालुक्यातील पहिलीच वेळ असल्याने जनतेतून कौतुक होत आहे.हि मोहिम अशीच चालु राहिल्या मुख्य सूत्रधारां पर्यंत पोहचण्यास वेळ लागणार नाही. मटका व गुटखा हा काही कर्नाटक मधुन येत नसुन याचे मुख्य स्त्रोत करमाळा तालुक्यातच असल्याने हि विक्री अथवा मटका बुकींग हि वेगाने होत होती.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

परवा राजुरी येथील एका महिलेच्या गुत्त्यावर स्वतः पोलीस निरीक्षक कोकणे यांच्या उपस्थितीत धाड टाकून देशी दारुसह हातभट्टी चा अड्डा उद्ध्वस्त केला आहे. ग्रामीण भागातील छोटे मोठे अवैध व्यवसायीक यांच्या मुसक्या आवळल्या गेल्याने व धाडसत्र सुरु असल्याने गुटखा सप्लाय करणारे मोठे ठेकेदार गुटखा किंग,तसेच डुप्लिकेट दारु स्पलायर, व करमाळा ,जेऊर,केम ,जिंती पारेवाडी या भागासाठी मटक्याचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांचे धाबे दणाणून गेले आहेत . हे सर्व अवैध व्यवसायीक पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या रडारवर असुन लवकर पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे धडाकेबाज कारवाई करून यांच्या मुसक्या आवळुनच अवैध धंद्यांविरोधातील मोहीम पुर्ण करतील आशी सर्व सामान्य जनतेला खात्री आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

करमाळा शहर व तालुक्यात डुप्लिकेट दारु स्पलायर, गुटखा किंग ,तसेच मटका बुकींचे मोठे रॅकेट आहे व यांना 'खादीचे' पाठबळ मिळत असल्याने 'खाकी' हतबल होत होती.त्यामुळे आज पर्यंत हे पावरफुल होते. पोलीसांचे हात आपल्या पर्यंत पोहचणारच नाहीत अशी यांना जणु खात्रीच होती . त्यामुळे यांचा समाजात बिनधास्त वावर असायचा. यांच्या अवैध धंद्या मुळे अनेक गोरगरीबांचे कुटुंब उद्ध्वस्त झाली,अनेक तरुण मुलं व्यसनाच्या व चुकीच्या मार्गाला लागली तर ,अनेक माता भगीणींच्या कपाळाचे कुंकु या नराधमांनी पुसले मात्र पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी खाकी ची पावर दाखवायला सुरुवात केली असून लवकरच गुटखा,मटका,डुप्लिकेट दारु चे मुख्य सूत्रधारांच्या मुसक्या आवळुन तालुक्यातील अवैध धंद्यावाल्यांचे कंबरडे मोडुन काढतील आशी अपेक्षा तालुकावासीयांना लागली आहे . कोरोना कालावधीत नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी कोकणे यांच्या नेतृत्वाखाली लाॅकडाऊन चा काळ प्रभावी पणे पार पाडला गेला .आत्ता नागरिकांच्या आरोग्या बरोबरच व्यसना मुळे गरीबांचे उद्ध्वस्त होणारे कोकणे यांच्या मोहिमेमुळे नक्कीच वाचतील. व पोलिसांचे हात खूप लांब असतात त्या मुळे ते नक्कीच मुख्य सूत्रधारां पर्यंत पोहचणार अशी चर्चा जनतेतून होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts