loader
Breaking News
Breaking News
Foto

आगळावेगळा बैलपोळा साजरा करणारे एन. एस. एसचे कोरोनायोद्धे,

सध्या बैल पोळ्या निमित्त बैल रंगवताना त्यावर नेते मंडळीचे फोटो ,राजकीय पक्षांची नावे रंगवण्याचे फॅड आले आहे.तर काही जण बैलांच्या अंगावर पेंटींग करुन सरकारच्या चुकिच्या धोरणावर देखील ताशेरे ओढत आहेत मात्र करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय च्या राष्ट्रीय सेवा योजना + 2 च्या स्वयंसेवकांनी बैलांच्या अंगावर पेंटींग काढून समाजप्रबोधनाचा संदेश दिला आहे त्या मुळे हा बैल पोळा आगळावेगळा ठरला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तरच्या स्वयंसेवकांनी विद्या विकास मंडळाचे सचिव मा. विलासरावजी घुमरे सर , अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड , प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील , उपप्राचार्य संभाजीराव किर्दाक यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मौजे उमरड या गावात एक आगळा वेगळा व वैशिष्ट्यपूर्ण समाजप्रबोधन व जनजागृती करणारा बैलपोळा साजरा केला. भारतीय संस्कृतीत बैल पोळा या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या आधुनिक युगात बैल गाईंची संख्या कमी होत असताना महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी एकत्र येऊन संपूर्ण गावासाठी व समाजासाठी एकत्र येऊन बैलपोळ्याच्या माध्यमातून कोरोनासारख्या महामारी बद्दल जनजागृती केली.या स्वयंसेवकांनी बैल रंगविताना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी लक्षात घेऊन इको - फ्रेंडली रंग तयार करून गावातील गाई-बैल रंगवले. त्यावर कोविड बद्दल जनजागृती करणारी घोषवाक्य लिहुन व पर्यावरण संवर्धन बाबतचे लोगो रंगवून संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले व सध्याच्या ज्वलंत सामाजिक समस्येवर मात करण्यासाठी बैलपोळ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्यात आले. यावेळी संपूर्ण ग्रामस्थांमध्ये या स्तुत्य उपक्रमाबद्दल कुतूहल निर्माण झाले .

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या आगळ्यावेगळ्या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक रोहन बदे , विष्णू बदे , महेश बदे, ओंकार बदे, मयूर कोठावळे, सलीम मुलानी यांनी विशेष परिश्रम घेतले. या स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजना + 2 स्तरचे जिल्हा समन्वयक प्रा.लक्ष्मण राख, प्रा. बिभिषण मस्कर, प्रा. विजय वारुळे , प्रा.दिलीप थोरवे, प्रा.सौ. सुजाता भोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या आगळ्या वेगळ्या बैल पोळ्याचे सर्वत्र कौतुक व चर्चा होत आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts