loader
Breaking News
Breaking News
Foto

. कुकडीचे पाणी मांगी तलावात बंद पाइपलाईन द्वारे सोडण्याच्या कामाचे सर्वेक्षणाचे आदेश.आ. संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश सुजित बागल यांनी केले कौतुक !

करमाळा तालुक्याचे आ.संजयमामा शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री ना.जयंत पाटील साहेब यांच्याकडे कुकडी प्रकल्पातून मांगी तलावात बंद पाईपलाईनद्वारे पाणी सोडण्याच्या कामासाठी चे सर्वेक्षण करावे असे आदेश मा. कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांना द्यावेत अशी विनंती दिनांक 10 ऑगस्ट रोजी पत्राद्वारे केली होती. या पत्राची तात्काळ दखल घेऊन ना.जयंत पाटील यांच्या जलसंपदा विभागाने महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाला सदर कामाचे तात्काळ सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करण्याचा आदेश जारी केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

वर्षभरापूर्वीच आ. संजयमामा शिंदे यांनी जलसंपदा मंत्री यांचेसोबत झालेल्या बैठकीत कुकडीचे पाणी मांगी तलावात बंद पाईपलाईन द्वारे सोडण्याचा विषय घेतलेला होता .प्रत्यक्षात सर्वेक्षण करून अंदाजपत्रक तयार करण्याचा आदेश मिळाल्यामुळे मांगी तलावात कुकडीचे पाणी बंद पाईपलाईनद्वारे येण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

दरम्यान मांगी येथील शिंदे गटाचे नेते सुजित तात्या बागल यांनी आमदार संजय मामा शिंदे यांच्या या कामाचे कौतुक केले असुन मांगी तलावात कायमस्वरुपी पाणी मिळाल्यास शेती व पिण्याच्या पाण्याची सोय होणार आहे तसेच एमआयडीसी साठी लागणाऱ्या पाण्याची गरज भागणार असुन एमआयडीसी झाल्यावर मांगी व करमाळा परीसरातील युवकाच्या हाताला काम मिळेल असे सांगीतले आहे. त्या मुळे आमदार संजयमामा शिंदे करत असलेल्या पाठपुराव्या बद्दल आभार व्यक्त करत कौतुक केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts