loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते राजुरी येथे विविध विकासकामांचे उदघाटन

राजुरी तालुका करमाळा येथे तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते आज विविध विकास कामांचे उदघाटन व लोकार्पण सोहळा पार पडला. यामध्ये केतुर नंबर 2- केत्तुर -वाशिंबे- सोगाव- राजुरी- सावडी प्रजीमा१२५ ,राजुरी गावाजवळ कि. मी १६/०० मध्ये पोच मार्गासह लहान पुलाचे बांधकाम करणे. २) २५१५ ग्राम विकास कामे योजना मौजे राजुरी येथील शिंदे वस्ती वर सामाजिक सभागृह बांधणे. ३) मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत राजुरी ते वाशिंबे या 5.4 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण अशा विविध विकास कामांचे उद्घाटन सोहळा पार पडला.याशिवाय संत सावतामाळी मंदिर परिसर, मारुती मंदिर परिसर, आणि सारंग कर वस्ती शाळेसमोरील पटांगणामध्ये पेवर ब्लॉक व राजुरी ओढा खोलीकरण कामाचा लोकार्पण सोहळा ही आमदार शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सरपंच डॉ अमोल दुरंदे यांनी प्रास्तविक करताना राजुरी गावासाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र, राजुरी तलावात कुकडीचे पाणी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यासाठी ठराव मांडला असता गावातील समोर बसलेल्या सर्वांनी हात उंचावून मामांना पाठिंबा दर्शवीला.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

राजुरीसाठी स्वतंत्र वीज उपकेंद्र निर्मिती चा संकल्प राजुरी गावासाठी विजेची वाढती मागणी लक्षात घेता राजुरी गावासाठी स्वतंत्र ३३/११ के व्ही वीज उपकेंद्र निर्मितीचा संकल्प राजुरी चे ग्रामदैवत श्री बाळनाथ स्वामी महाराजांच्या मंदिरात आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते पूजा करून सोडण्यात आला. यानंतर श्री संत सावता माळी मंदिर परिसरात झालेल्या जाहीर सभेत आमदार संजय मामा शिंदे यांनी राजुरी साठी स्वतंत्र सब स्टेशन निर्मितीचे आश्वासन दिले.यावेळी बारामती ॲग्रो चे उपाध्यक्ष सुभाष गुळवे,नंदकुमार जगताप ,श्रीकांत साखरे यांची भाषणे झाली. यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तानाजी बापू झोळ, करमाळ्याचे युवक नेते शंभूराजे जगताप ,कंदर चे सरपंच भास्करराव भांगे, सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव दादा माळी, सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य निळकंठ आप्पा देशमुख, सतीश शेळके , डॉ गोरख गुळवे, सूर्यकांत पाटील, अशोक पाटील, देवराव बापू नवले, राजेंद्र बाबर, सावडी चे सरपंच भाऊसाहेब शेळके, करमाळा तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, तुषार शिंदे ,दिवेगव्हाण चे सरपंच श्री भरत खाटमोडे, उंदरगाव चे सरपंच हनुमंत नाळे, रिटेवाडी चे सरपंच दादासाहेब कोकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्री उबाळे साहेब, महावितरणचे उपअभियंता श्री सुमित जाधव साहेब यांच्यासह राजुरी आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

आभार संजय साखरे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा रणजित शिंदे यांनी केले.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts