राजुरी ता. करमाळा येथील नागरिकांसाठी राजुरीचे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत साखरे यांच्या प्रयत्नातुन तसेच कोर्टी PHC च्या मदतीने ४५ वर्षे वयापुढील २५० नागरिकांना कोरोना लसीकरण करण्यात आले.तसेच १८वर्षे वयापुढील नागरिकांना देखील लस देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत राजुरीत अवघे दोन रुग्ण आढळून आले होते असे असतानाही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मात्र गावातील नागरिकांना प्रचंड अडचणी आल्या होत्या. गावातील तरुण नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.गावची लोकसंख्या पाहता गावातील मयत आणि रुग्णसंख्या वाढत चालली होती,त्याचबरोबर काही नागरिक दगावल्याने नागरिकांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली होती.
राजुरीच्या तरुणांनी कोरोनाच्या काळात गावातील नागरिकांना करमाळा अकलूज बारामती पुणे भागातील मोठ्या हॉस्पिटलमध्ये गावातील युवा सहकाऱ्यांच्या मदतीने बेड,इंजेक्शन, प्लाजमा मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले होते. अशी भयावह परिस्थिती असतानाही कोरोनाच्या लसीकरणाचा कॅम्प गावात होत नसल्याने गावातील नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता आणि भीती होती. मात्र ही अस्वस्थता श्रीकांत साखरे,उमेश साखरे,अजय साखरे,भैया निरगुडे,समाधान मोरे ,सागर कुलकर्णी, सुहास साखरे,सागर दुरंदे यांच्या लक्षात आली होती तेव्हापासून गावात जास्तीत जास्त नागरिकांना स्लिप वाटपाद्वारे लसीकरण चालू असताना सहकार्य करत असताना उशिरा का होईना पण कोर्टी PHC च्या सर्व टीमच्या मदतीने गावात २५० लसींचा लसीकरण कॅम्प घेऊन मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले. उर्वरित नागरीकांना देखील लवकरच अश्याच प्रकारे मोठा कॅम्प घेऊन पुढील काही दिवसांत राजुरी गावचे पूर्णपणे लसीकरण करण्यात येईल असं आश्वासन कोर्टी PHC च्या टीम कडून मिळाल्याची माहिती श्रीकांत साखरे यांनी दिली.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.