करमाळा बाजार समितीच्या सचिव पदाचा पदभार क्षीरसागर यांचेकडेच राहणार असून पणन संचालक मंडळाने सभापतींचा आदेश रद्द केला आहे. त्यामुळे सेवाज्येष्ठता व पात्रतेतुसारच सचिवाची निवड निश्चित करण्यात आल्याने विठ्ठल क्षीरसागर हेच सचिव पदाचा कारभार संभाळतील हे स्पष्ट झाले आहे.पणन संचालक मंडळाचा हा निर्णय जगताप गटासाठी दिलासा देणारा ठरला असून बागल गटाला व सभापती प्रा शिवाजीराव बंडगर यांना झटका देणारा ठरला आहे.
बहुचर्चित अशा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीने सचिव पदाचा पदभार पाटणे यांना सोपविण्याचा करमाळा बाजार समितीचा ठराव व सभापतींचा आदेश सतीश सोनी पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी रद्दबातल ठरविल्यामुळे विठ्ठल क्षीरसागर यांचेकडेच सचिव पदाचा पदभार कायम राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे . जगताप व बागल गटाने अतिशय प्रतिष्ठेचा केलेला व गेली ३ महीने सुरु असलेला सचिव पदाचा वाद आता संपुष्टात आला आहे . पणन संचालकांच्या निर्णयामुळे बाजार समितीचे सभापती बंडगर व बागल गटाला जबरदस्त धक्का बसला आहे . स्थापने पासूनच बाजार समितीवर गेली ३० वर्षे असलेली माजी आमदार जयवंतराव जगताप यांची असलेली पकड या निर्णयामुळे अधिक मजबूत झालेली आहे .
भगवान के घर देर है लेकिन अंधेर नही करमाळा बाजार समितीच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे भक्कम पाठबळ व आशीर्वाद, आमदार संजयमामा शिंदे यांनी ठामपणाने केलेले सहकार्य, आमच्या सर्व कर्मचारी वर्गाची निष्ठा व एकजूट, व्यापारी व शेतकरी यांचे शुभेच्छांमुळे तसेच सेवाज्येष्ठता व पात्रता या सर्व कायदेशीर बाबींचा विचार करूनच मा .पणन संचालक सतिश सोनी साहेब यांनी आमच्या बाजूने न्यायाचा निर्णय दिला आहे . यापुढे देखील बाजार समितीचे कामकाज करताना माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे खंबीर नेतृत्त्व व मार्गदर्शन तसेच आमदार संजयमामा शिंदे यांचे सहकार्याने व संचालक मंडळाच्या समन्वयातून शेतकर्यांचे व बाजार समितीचे प्रगतीचे , हिताचेच काम कायद्याच्या चौकटीत राहून करणार आहे .करमाळा बाजार समितीस देशभक्त नामदेवराव जगताप व माजी आ. जयवंतराव जगताप यांनी विश्वसनीय बाजारपेठ असा मिळवून दिलेला नावलौकिक टिकविणे साठी आम्ही सर्व कर्मचारी वृंद अहोरात्र परिश्रम करणार आहोत .- विठ्ठल क्षीरसागर ( सचिव, बाजार समिती )
करमाळा बाजार समितीच्या स्थापने पासून काही अपवाद वगळता जगताप गटाचेच वर्चस्व आहे . माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सलग २९ वर्षे बाजार समितीचे सभापती पदी कामकाज पाहीले आहे . परंतु सन २०१८ साली झालेल्या निवडणुकीत अंतर्गत बंडाळीतून जगताप गटातून निवडून आलेले शिवाजी बंडगर यांनी बंडखोरी करत सभापती पद मिळवले होते . परंतु तेव्हापासून आजतागायत बाजार समितीवर सातत्याने राजकीय अस्थिरतेचे परिणाम जाणवत आहेत . त्यातच बाजार समितीचे सचिव सुनील शिंदे हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले . त्यावेळी शिंदे यांनी सेवाज्येष्ठता व कायदयातील तरतुदीनुसार सेवाज्येष्ठ कर्मचारी विठ्ठल क्षीरसागर यांचेकडे सचिवपदाचा पदभार सोपविला व बाजार समितीत नवीन वादाला तोंड फुटले . सभापती बंडगर व बागल गटाला सचिव पदाचा पदभार क्षीरसागर यांचेऐवजी पाटणे यांचेकडे सोपवायचा होता . क्षीरसागर यांचेकडील पदभार मान्य नसल्यामुळे सभापती बंडगर यांनी पणन संचालक यांचेकडे तक्रार करत सचिव पदभारा बाबत जिल्हा उपनिबंधकांच्या उपस्थितीत नव्याने संचालक मंडळाची बैठक आयोजीत करणेची मागणी केली . त्यानुसार २९जून रोजी झालेल्या बैठकीत समसमान मते पडल्यामुळे सभापतींच्या निर्णायक मताच्या आधारे पाटणे यांचा ठराव मंजूर झाला .परंतु या बैठकीत जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी कर्मचारी सेवानियम व कायद्याच्या तरतूदी अवगत करत तशी इतिवृत्तात नोंद केली होती . पाटणे यांचा ठराव मंजूर झाला पण क्षीरसागर यांनी चार्ज देणेस ठामपणे नकार देत तातडीने ठरावाच्या व पूर्वीच्या आदेशा विरोधात पणन संचालकांकडे अपील दाखल केले . त्यावर पणन संचालकांनी १२ जुलै स्थगिती आदेश दिल्यामुळे क्षीरसागर यांचेकडेच सचिव पदाचा पदभार होता . त्यानंतर आता पणन संचालक सतिश सोनी यांनी विठ्ठल क्षीरसागर यांनी सेवा ज्येष्ठता व पात्रतेनुसार सचिव पदी नेमणुकीबाबत केलेले अपील व मागण्या मंजूर करीत बाजार समितीने केलेला ठराव व सभापतींचा आदेश रद्दबातल ठरविला आहे . त्यामुळे क्षीरसागर यांचे कडील सचिव पदाचा पदभार कायम राहीला आहे.
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.