loader
Breaking News
Breaking News
Foto

अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने ग्राहक चळवळीचा स्थापना दिवस करमाळ्यात उत्साहात संपन्न

अखिल भारतीय ग्राहक पंचायत च्या वतीने ग्राहक चळवळीचा स्थापना दिवस कमलादेवी कन्या विद्यालय करमाळा येथे कोरोनाचे नियम पाळून संपन्न झाला. तसेच शिक्षक दिन ही साजरा करण्यात आला. यावेळी स्वामी विवेकानंद,डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन व ग्राहकतिर्थ बिंदू माधव जोशी (नाना) यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरुवात झाली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या स्थापना दिवसानिमित प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपचे तालुकाध्यक्ष तथा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संचालक गणेश चिवटे उपस्थित होते. त्याचबरोबर याप्रसंगी ग्राहक पंचायतचे जेष्ठ मार्गदर्शक तथा स्वामी विवेकानंद संस्थेचे संचालक मा. सच्चिदानंद साखरे ग्राहक पंचायत अध्यक्ष ॲड. प्रा. शशिकांत नरुटे माजी अध्यक्ष मा. भिष्माचार्य चांदणे सर ग्राहक पंचायतचे सहसचिव मा. अभय पुराणिक त्याचबरोबर कन्याशाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

यानिमित्ताने गणेश चिवटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गोर-गरीब ग्राहकांसाठी ग्राहक पंचायत ही अतिशय मोलाची कामगिरी करत असून ग्राहक पंचायतने भविष्यात अनेक लोकोपयोगी व जनहितार्थ कामे करुन समाज शोषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत.तसेच सच्चिदानंद साखरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आमची ग्राहक पंचायत ही कोणा विक्रेत्याच्या विरोधात नसुन ती अनुचित व्यापार करणाऱ्या प्रवृत्ती सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. भिष्माचार्य चांदणे सर यांनी केले सूत्रसंचालन ॲड. प्रा. शशिकांत नरुटे सर यांनी केले. 1सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2021 हा सदस्य नोंदणी कालावधी असून तालुक्यातील नागरिकांनी ग्राहक पंचायतीत सदस्य नोंदणी करावी. असे आवाहन तालुका अध्यक्ष नरुटे सर यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शन मा. अभय पुराणिक यांनी करुन कार्यक्रम संपन्न झाला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts