loader
Breaking News
Breaking News
Foto

आंदोलन करणाऱ्या मच्छिमार बांधवाना गुंड म्हणणारा ठेकेदारच खरा गुंड,करमाळा परांडा येथील मच्छिमार बांधवांचा पत्रकार परिषदेत आरोप.

सिना कोळगाव धरणात स्थानिक मच्छिमार बांधवाना मासेमारीसाठी शासकीय नियमानुसार पास (परवाना) मिळावा या करता जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसे यांच्या नेतृत्वाखाली उस्मानाबाद येथील मत्स्य विभागाचे आयुक्तालयावर कब्जा घेतला होता.या आंदोलनात करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण, हिवरे,कोळगाव, निमगाव खांबेवाडी धायखींडी बोरगाव या गावांसह परांडा तालुक्यातील आलेश्वर, दिलमेश्वर बंगाळवाडी,डोंजा ,या गावातील मच्छिमार बांधव व भोई समाजाने हिरारीने सहभाग घेतला होता .या आंदोलनास हिसरेचे माजी सरपंच पै बाळासाहेब पवार , मि वडार महाराष्ट्राचा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास ननवरे यांनी देखील जाहीर पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला होता.या आंदोलनाची तिव्रता एवढी वाढली होती की जिल्हाधिकारी ,तहसीलदार, डि वाय एसपी ,पोलिस निरिक्षक रात्रभर आंदोलन स्थळी तळ ठोकून होते. अखेर जिल्हाधिकारी यांनी सिना कोळगाव धरणात मच्छिमारीचा शासकीय ठेका असलेली तुळजाभवानी मच्छिमार संस्थेस स्थानीक मच्छिमार यांना पास देण्याचा आदेश काढला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मात्र तुळजाभवानी मच्छिमार सोसायटीचे बालाजी सल्ले यांनी असा पास देणे शक्य नसल्याचे सांगत आंदोलनात आलेले सर्व मच्छिमार नसून गुंड असल्याचे वक्तव्य एका स्थानीक वृत्त वाहिनीवर केले होते ,बालाजी सल्ले यांच्या या वक्तव्याचा करमाळा परांडा तालुक्यातील मच्छिमार बांधवानी निषेध केला असून बालाजी सल्ले हाच खरा गुंड असल्याचे सांगत माजी सरपंच बाळासाहेब पवार ,विकास ननवरे ,माजी सरपंच संतोष लावंड ,ग्रामपंचायत सदस्य श्रीराम सुरवसे ,कोळगावचे माजी सरपंच अनिल शिंदेहे आम्हाला सहकार्य करत असल्याचे सांगीतले आहे.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

या वेळी मच्छिमार बांधवांनी महिला मुलांसह पत्रकार परिषद घेतली असून बालाजी सल्ले याचे पिस्तुल हातात असल्याचे फोटो दाखवून त्याच्या पासून आमच्या जिवाला धोका असल्याचा आरोप केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

या वेळी मच्छिंद्र भोई, बालाजी भोई, पिंटु भोई अशोक नगरे, उषाबाई सल्ले,नंदा भोई,शिल्पा शिंदे,मैनाबाई भोई हाईराम सल्ले परशु भोई, आदी मच्छिमार बांधव उपस्थित होते.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts