loader
Breaking News
Breaking News
Foto

ग्रामपंचायत विभाजना मुळे वांगी गावांच्या विकासास चालना मिळेल-मा .आ नारायण पाटील

ग्रामपंचायत विभाजना मुळे वांगी गावांच्या विकासास चालना मिळेल असे प्रतिपादन मा .आ नारायण पाटील यांनी व्यक्त केले अधीक बोलताना पाटील म्हणाले की नागरिकांना अनेक वर्षांपासून प्रशासकीय कामात येत असलेल्या अडचणी वांगी ग्रामपंचायतीच्या विभाजनामुळे संपुष्टात येतील व गावांचा विकास गतीने होईल असे प्रतिपादन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले. उच्च न्यायालयाने वांगी ग्रामपंचायत विभाजनाचा आदेश राज्यसरकारला पारीत केल्यानंतर याचिकाकर्त्यांचा सत्कार आज पाटील कार्यालयात करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बापूराव रणसिंग होते. याचिकाकर्ते रामेश्वर तळेकर व गणेश जाधव यांचे सत्कार मा आ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना पाटील म्हणाले की ग्रामपंचायतीच्या विभाजनाने प्रत्येक गावात स्वतंत्र प्रशासन यंत्रणा निर्माण होईल व याचा परिणाम विकासकामाच्या वेगावर होईल. मी स्वतः जि प सदस्य म्हणून या गटातील अडचणी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्या. नंतर आमदार म्हणून मला जनतेने संधी दिल्यावर अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या अठरा नागरी सुविधा व पुनर्वसन कामाचा प्रश्न मी निधी मंजूर करुन सोडवला. आगामी काळात या गावांना आपले सहकार्य असल्याचे पाटील यांनी सांगितले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

प्रास्तविक प्रा अर्जुन सरक यांनी केले तर आभार सुनील तळेकर यांनी मानले. यावेळी पृथ्वीराज पाटील, गुरूदास महाडीक, पोपट सातव, सुधीर रोकडे, हनूमंत शिंदे,नाना गोडगे, भाऊ गोडसे, कल्याण शिनगारे, नाना तकीक, हरी तकीक, सरपंच दत्ता मेनकुदळे, अशोक वाघमोडे, सोमनाथ भानवसे, दत्ता आरकिले, विशाल तकीक, राहूल जाधव, काका जाधव, बाबा पटेल, नितीन जाधव, नितीन जगताप, प्रदिप जगताप, अशोक खराडे, धनंजय खराडे, दशरथ चव्हाण आदि उपस्थित होते.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

==================== माजी आमदार नारायण पाटील यांनी मंत्रीमहोदयांच्या उपस्थित बैठकीत तसेच विधानसभेच्या अधिवेशनात तारांकीत प्रश्न मांडून विभाजनाचा मुद्दा प्रकाशात आणला. तसेच आ. रणजितसिंह मोहिते-पाटील व जि प अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी सुध्दा या प्रकरणी सरकारकडे निवेदने सादर केली असल्याची माहिती याचिकाकर्ते रामेश्वर तळेकर, गणेश जाधव, नितीन तकीक, दिपक देशमुख यांनी दिली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts