loader
Breaking News
Breaking News
Foto

सरकार कोणाचेही असो छत्रपतींचा अवमान कराल तर याद राखा . -शरदचंद्र सुर्यंवशी

कर्नाटक सरकारने हद्द पार केली असून, महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या छत्रपती शिवरायांचा पुतळा एका रात्रीत काढुन महाराष्ट्रच नव्हे ,तर संपूर्ण हिंदुस्तानातील शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. हा पुतळा पुन्हा सन्मानाने आहे, त्या जागी विराजमान करा, अन्यथा कर्नाटकात सरकार कोणाचेही असो सरकार व प्रशासनाची मस्ती जिरवायला वेळ लागणार नाही असा सज्जड इशारा शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक शरदचंद्र सुर्यंवशी यांनी प्रसिद्धि पत्रका द्वारे कर्नाटक सरकारला दिला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

या वेळी अधीक बोलताना सुर्यवंशी म्हणाले की केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे असे आसताना त्या ठिकाणच्या प्रशानाची हिंदुच्या अस्मितेला डिवचण्याची हिमंत कशी झाली असा सवाल देखील उपस्थिति केला असुन छत्रपतिंचा आशीर्वाद घेवुन केंद्रात सत्तेत आलेल्या भाजापाने कर्नाटक सरकारला जाब विचाराव अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील असा ईशारा देखील शरदचंद्र सुर्यंवशी यांनी दिला आहे.

दौंड प्रतिनिधी

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

सीमाभागातील बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने रातोरात हटविला असुन या संतापजनक घटनेचा पुणे जिल्हा शिवसेनेच्या वतिने तिव्र निषेध नोंदवला आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts