loader
Breaking News
Breaking News
Foto

पाच तारखेपासून पुन्हा वीज बिल वसुली मोहीम! तालुक्यातील आजी माजी आमदारांसह प्रमुख नेत्यांनी घेतली हि भुमीका.

मध्यंतरी वीजबिल वसुली साठी वीज कपात करण्यात आली होती अतुल खुपसे यांनी केलेला रस्ता रोको आमदार संजय मामा शिंदे यांनी मंत्रालयात केलेला पाठपुरावा तसेच माजी आमदार नारायण पाटील गटाकडून प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी रस्त्यांवर उतरण्याचा दिलेला इशारा तर बागल गटाचे दिग्विजय बागल यांनी उर्जामंत्र्याला दिलेले निवेदन, संभाजी ब्रिगेड शेतकरी संघटना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजय घोलप यांनी घेतलेली आक्रमक भुमीका या मुळे वीजपुरवठा सुरळीत झाला असला तरी वीज कपातीची टांगती तलवार शेतकऱ्यांच्या मानगुटीवर असून चार ते पाच तारखेपासून पुन्हा एकदा वसुली मोहीम सुरु करणार असल्याचे महावितरण कडुन सांगण्यात आले आहे. वीज कट करण्या आगोदर प्रत्येक शेतकऱ्यांना मोबाइलवरून मेसेज दिले जातील त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत वसुली टार्गेट पुर्ण होई पर्यंत वीज कट केली जाईल असे महावितरण चे गलांडे साहेब यांनी सांगीतले आहे..या मुळे जर पुन्हा वीज कपात झाली तर तालुक्यातील आजी माजी आमदार व प्रमुख नेत्यांची काय भुमीका असणार हे जाणून घेण्याचा करमाळा चौफेर ने प्रयत्न केला असून कोण काय म्हटले ते पहा .

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

सरकार शेतकऱ्यांचे आहे असे एकीकडे म्हटले जाते मग शेतकऱ्यांना का वेठीस धरता ?सध्या दुष्काळी परस्थीती असल्यासारखे दिवस आहेत पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम वाया गेला आहे. तालुक्यातील उजनी भाग सोडला तर बॅकवॉटर भागात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. संपुर्ण महाराष्ट्रातील शेतकरी काही ठिकाणी अतिवृष्टी मुळे तर काही ठिकाणी पाऊस नसल्याने संकटात आहेत आपण ज्यांना आमदार म्हणून निवडून दिले आहे त्यांनी संपूर्ण वीजबिल माफी साठी विधानसभेत आवाज उटवावा या उपर जर महावितरण ने वीज कनेक्शन कट केले तर स्वतः शेतकऱ्यांना सोबत रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दिला आहे.तर ज्या दिवशी रास्ता रोको केला त्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत वीज कपात केली जाणार नाही असे आश्वासन घेऊनच माघार घेतली आहे. ज्या शेतकऱ्यांची ऐपत आहे त्यांनी बील भरण्यास हारकात नाही मात्र जर महावितरण ने वसुली साठी कनेक्शन कट केले तरी राजकीय द्वेषातुन पोलीसांकडून होणाऱ्या कारवाईला न घाबरता रस्त्यावर उतरणार असुन शेतकऱ्यांसाठी शेकडो गुन्हे अंगावर घेण्यास अतुल खुपसे घाबरणार नाही असे जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसे यांनी सांगीतले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

एक तर जिल्हाधिकाऱ्यांकडून सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर होण्यासाठी प्रस्ताव जाणे गरजेचे असताना वसुली साठी तगादा लावणे बरोबर नाही .दर दोन तिन महिन्याला दहा हजार ,पंधरा हजार शेतकऱ्यांनी कुठून भरायचे एक तर सरकारने संपूर्ण वीज बिल माफी साठी विचार करावा किंवा जानेवारी फेब्रुवारीपर्यंत मुदत द्यावी .मुख्यमंत्री व उर्जा मंत्री यांना देखील समक्ष भेटुन निवेदन देणार असल्याचे बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांनी सांगीतले. या उपर जर कनेक्शन कट केले तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करु आसा इशारा देखील त्यांनी दिला आहे. आमदार संजयमामा शिंदे यांची देखील भुमीका जाणुन घेतली असून ते म्हणाले की सध्या कोविड चे मुळे तसेच पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याने शेतकरी प्रंचड आडचणीत आहे.अनेक कुटुंबातील कर्ते धरते लोक मयत झाले आहेत तर अनेकांना उपचारांसाठी लाखोंचा खर्च आला आहे.आशा परिस्थितीत शेतकऱ्यांची भुमीका अतिशय रास्त असुन माझा शेतकऱ्यांना पाठिंबा आहे. आठ तास अखंड वीज व बील माफीसाठी मी आमदार या नात्याने शासनस्तरावर पुर्ण प्रयत्न करेल . असे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगीतले असुन मध्यंतरी वीज कट केल्यानंतर दोन तास वीज सोडायला सांगा असे लोकांचे फोन होते त्या मुळे मी दोन तास वीज सोडा आशी तात्पुरती भुमीका घेतली होती.मात्र उर्जा मंत्री यांना आठ तास वीज द्यावी असे पत्र दिले होते असा खुलासा देखील आमदार संजयमामा शिंदे यांनी यावेळी केला.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

माजी आमदार नारायण पाटील गटाकडून देखील भुमीका स्पष्ट करण्यात आली असून त्यांनी म्हटले आहे की मतदार संघातील शेतीपंपासाठी पुर्ण दाबाने अखंडीतपणे किमान आठ तास तरी वीज पुरवठा केला जावा ह्या मागणीवर माजी आमदार नारायण पाटील हे ठाम आहेत. या मागणीसाठी पाटील गट शेतकऱ्यां बरोबर असुन वेळप्रसंगी आंदोलन करावे लागले तरी मागे हटणार नाही. खरंतर गेली दोन वर्षे कोरोनामुळे शेतकरीही आर्थिक अडचणीत असुन शासनाने वीजबिल वसुली ऐवजी संपुर्ण वीजबिल माफ करावे हि पाटील गटाची मागणी आहे.करमाळा तालूक्याच्या पुर्व भागात वाढती वीजेची मागणी लक्षात घेता 220 केव्हिचे नवीन वीज केंद्र गौंडरे येथे व आवाटी येथे 33/11 केव्हिचे उपवीजकेंद्र निर्माण केले जावे अशी मागणी मा. आ. पाटील यांनी उर्जा विभागाकडे केली आहे. पुर्ण दाबाने अखंडीत वीज पुरवठा केला गेल्यास शेतकरी स्वतः हुन वीजबिल भरण्यास पुढे येतील. परंतु तुर्तास तरी संपूर्ण वीज बिल माफी हाच पर्याय अंमलात आणला जावा. वीज बिल वसुलीसाठी वीज कपात करु नये. : सुनील तळेकर प्रवक्ते, पाटील गट

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts