loader
Breaking News
Breaking News
Foto

मकाई चे संचालक अमोल पवार यांची भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा सचिव पदी निवड

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हा सचिव पदी करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील मकाई कारखान्याचे संचालक अमोल पवार यांची निवड करण्यात आली आहे जिल्हाध्यक्ष प्रकाश घोडके यांनी नियुक्तीपत्र देवुन हि निवड जाहीर केली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

निवडीनंतर करमाळा चौफेर शी बोलताना ते म्हणाले की आजच्या पिढीतील तरुण मित्रांना भाजपाची विचारधारा पसंद आहे यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण प्रवास करून त्यांच्याशी संवाद साधून युवा मोर्चा मध्ये त्यांना सामील करून आगामी कालावधीमध्ये शतप्रतिशत भाजप करण्यावर आपला भर राहणार आहे असे सांगीतले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

केंद्रात भाजपची सत्ता आहे केंद्राचे लोक कल्याणकारी निर्णय तसेच महाराष्ट्र मध्ये सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजपाची कामगिरी उल्लेखनीय आहे जिल्ह्यामध्ये प्रवास करताना संघटन बांधणी केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवणे यावर आपला भर राहील असे सांगीतले असुन

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

पुढील कालावधीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका या निवडणुकांमध्ये युवा वर्ग मोठ्या प्रमाणात सामील करणार असल्याचा निर्धार देखील अमोल पवार यांनी व्यक्त केला.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts