loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार शिंदे यांचा वीज प्रश्नावरचा पाठपुरावा म्हणजे कावळ्याने कान तोडल्यावर कानाची जागा तपासण्या ऐवजी कावळा शोधत फिरण्याचा प्रकार .पाटील गटाची टिका!

एकिकडे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना महावितरण ने एक तारखेचा अल्टिमेटम दिला आहे त्यामुळे शेतकरी काळजीत आहेत .दुसरी कडे मात्र आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार नारायण पाटील गटात सुरु असलेला कलगीतुरा थांबायचे नाव घेत नाही. काल ठाकरे ,पाटील भेटीवर शिंदे गटाकडून केलेल्या टिकेला पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले असुन थेट संजयमामा शिंदे यांना टार्गेट केले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात तळेकर यांनी म्हटले आहे की, आ. संजयमामा शिंदे यांनी वीज प्रश्नाबाबत केलेला पाठपुरावा म्हणजे कावळ्याने कान तोडला म्हणून कानाची जागा तपासुन पाहण्या ऐवजी रानावनात त्याच कावळ्याचा शोध घेत फिरण्यासारखा हास्यास्पद प्रकार आहे, असा मार्मिक टोला पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी लगावला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मा. आ. नारायण पाटील यांनी घेतलेल्या भेटीनंतर शिंदे गटाकडून झालेल्या टिकेस उत्तर देताना त्यांनी थेट आ. शिंदे यांच्या कामकाज पध्दतीचा समाचार घेतला. ते म्हणाले की आपल्या मतदारसंघातील शेतीपंपासाठी केवळ दोन तास वीज मागणारे संजयमामा शिंदे हे राज्यातील पहिले आमदार असतील.शेजारच्या परांडा, कर्जत व इंदापुर तालूक्यात वीजबिल वसुलीसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार घडले नाहीत.वास्तविक पाहता जेऊर व करमाळा उपविभागाची बैठक घेऊन तालूक्यातील वीजेचा प्रश्न तालूक्यातच सोडवला गेला पाहिजे होता. मात्र आमदार शिंदे यांनी हा प्रश्न मंत्रालयाच्या दालनात नेऊन ठेवला. वीजबिल वसुली करताना वीजे अभावी शेतकर्‍यांच्या शेतातील उभी पिके जळू नयेत व गुरांच्या चारापाण्यासाठी अडचण येऊ नये अशा सुचना महावितरणला आ. शिंदे यांनी देणे सर्वांना अपेक्षित होते. मात्र करमाळा मतदार संघाचे आमदार हे येथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात कमी पडले हे सिध्द झाले आहे. मतदार संघातील जनता आता माजी आमदार नारायण पाटील व विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यपद्धतीची तूलना करु लागली असून आ. शिंदे यांचेकडून करमाळा तालूक्याबद्दल होत असलेला पक्षपात उघडपणे जाणवू लागला आहे. 2014 ते 2019 या कालावधीत मा. आ. नारायण पाटील यांचे हातून नवीन सबस्टेशन उभारणी, अतिरिक्त फिडर बसवून जुन्या सबस्टेशनची क्षमतावाढ, मतदार संघासाठी वाढीव ट्रान्सफॉर्मर अशी वीज इन्फ्रास्ट्रक्चरला बळकटी देणारी भरीव कामे झाली.वीज बिल वसुली अथवा वीजजोड तोडण्याचे प्रसंग शेतकऱ्यांवर कधी येऊ दिले गेले नाहीत. वीज ट्रान्सफॉर्मर तपासणी पथकाने जेंव्हा तालूक्याच्या पश्चीमभागात खास करुन वाशिंबे परिसरात वीजतोड करुन डिपी उतरवण्यास सुरुवात केली तेंव्हा तातडीने स्वतः तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी कार्यस्थळी जाऊन आपल्या खास शैलीत या पथकास हि मोहिम थांबवण्यास सांगितले व शेतकऱ्यांना कसा न्याय मिळवून दिला हे संपूर्ण मतदार जाणून आहे. उजनीकाठची वीजकपात जिल्हाधिकारी आदेशानुसार करावयास सुरवात झाली तेंव्हाही तात्काळ आमदारपदावर असुनही मतदारसंघातच शेतकऱ्याची बाजू घेत रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचे धाडस मा आ पाटील यांनी दाखवले. मा आ पाटील यांनी महावितरण मंडळाचे राज्याचे संचालक श्री ताकसोंडे यांना मतदार संघात बोलावून वीज दरबारात अनेक वर्षे रखडलेले वीजेचे प्रश्न सोडवले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

हि कामकाजपध्दत जनतेच्या हिताची होती. परंतु विद्यमान आमदार मात्र पुणे-मुंबई -पुणे प्रवास म्हणजेच खुप मोठं काम आहे असं समजतात.तर अधून मधून करमाळा तालूक्यास पर्यटन ठिकाण समजून भेट देतात. यातही ते बोटीने जलमार्गे वांगी परिसरात येण्याचे पसंद करतात. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व माजी आमदार नारायण पाटील यांची जवळीक पाहून आ. शिंदे अस्वस्थ झाले असून यातुनच शिंदे गटाने आमची निवेदने सार्वजनिक केली आहेत. विद्यमान आमदार हे बहूपक्षीय नेते असल्याने शिवसेनेत काय चालले याच्याबद्दल माहिती घेण्यात त्यांना अधिक रस असावा. पाटील गटावर टिका केल्याने आमदार शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर विविध बँकांकडून विनासंमती घेतलेली बोगस कर्जे, कोरोना कालावधीत मतदार संघाला वाऱ्यावर सोडून पुण्यनगरीत केलेला आराम, उजनीतुन इंदापुरसाठीच्या नियोजित उपसा सिंचन योजनेस पडद्याआडून दिलेली संमती,पंढरपुर पोटनिवडणुकीत फोल ठरलेला विजयाचा दावा या गोष्टी झाकणार नाहीत, असा हल्लाबोल करत आमदार पदावर असताना माजी आमदार नारायण पाटील यांनी 2024 पर्यंत पुरतील एवढे विविध विकासकामांचे प्रस्ताव मंत्रालयात सादर केले आहेत. विद्यमान आ. संजयमामा शिंदे यांनी हि पत्रे काॅपी पेस्ट करुन जरी नव्याने सादर केली व पाठपुरावा केला तरी मतदार संघाचे भले होईल, असा खोचक टोलाही सुनील तळेकर यांनी यावेळी लगावला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

नारायण पाटील गटाकडून केलेल्या टिकेला स्वतः आमदार संजयमामा शिंदे उत्तर देणार ,का? सोशल मिडीयातुन उत्तर दिले जाते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts