करमाळा तालुक्यात कधी कोणत्या मुद्द्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप व टिकेतुन वार- पलटवार होतील याचा काही नेम नाही . नुकतेच माजी आमदार नारायण पाटील व माढा विधानसभा मतदार संघ मागील निवडणुकीतील शिवसेना उमेदवार संजय कोकाटे मोहोळचे शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीबाबत नागरिंकांनी विविध तर्क वितर्क तपासुन पाहिले. हि भेट आमदार संजय शिंदे यांनी कारखान्यासाठी काढलेल्या शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज प्रकरण बाबत होती की राष्ट्रवादी कडुन शिवसेना पदाधिकारी मंडळीची होत असलेल्या गळचेपी बद्दल होती, का मग पक्षांतर्गत गटबाजी व पदाधिकारी फेरबदला बाबत होती या बाबत अनेक ठिकाणी विविध चर्चा झाली. वास्तविक या आगोदर देखील माजी आमदार नारायण पाटील हे अनेक वेळा उध्दव ठाकरे यांना भेटले आहेत ,मुख्यमंत्री झाल्यावर तीन वेळा भेटले आहेत मात्र, त्यांनी वेळोवेळी विकासकामांसाठीच निवेदने दिलेली आहेत.या भेटीतही त्यांनी काही निवेदने सादर केली. आता पर्यंत तरी शिवसेना पदाधिकारी फेरबदलात ते कधी पडले नव्हते . मात्र सध्या चालु असलेल्या शिवसेनेतील घडामोडी व आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक पाहता पदाधिकारी फेर बदल करण्याची मागणी अपेक्षितच होती मात्र या निवेदनाची प्रसिद्धी झाली नव्हती. पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांनी मात्र त्यावेळी हि भेट फक्त विकासकामांसाठीच होती हे ठणकावून सांगताना तालुक्यातील कोणते रस्ते व कोणत्या कामास किती निधी मिळाला याची आकडेवारी जाहीर करुन वर्तमान पत्रात प्रसिद्ध केली होती. याच मुद्द्यावर आता आमदार संजय मामा शिंदे गटाकडून टिका केली जात आहे. व यात पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांना प्रमुख लक्ष केले गेले आहे.कारण ठाकरे व पाटील यांच्या भेटीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना संजय कोकाटे यांच्या लेटर पॅडवरून दिलेले निवेदन शिंदे गटाच्या हाती लागले असून या निवेदनात म्हटले आहे की आम्ही तिघांनी शिवसेना पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे(नारायण पाटील अपक्ष) सध्या महाविकास आघाडी चे सरकार आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस कडुन गळचेपी होत आहे, कामे होत नाहीत, तसेच जे शिवसेना पदाधिकारी आहेत ते निष्ठावंत आहेत मात्र त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद निवडणुकीत यश येणे शक्य नाही तर काही संघटनात्मक फेर बदल व्हावेत .तसेच सर्वच गोष्टी पत्रात सांगता येणार नसून आम्हा तिघांना एकत्रीत अधिकचा वेळ द्या अशी विनंती केली आहे.या निवेदनावर संजय कोकाटे ,नारायण पाटील, व सोमेश क्षीरसागर यांच्या सह्या आहेत.
या मुद्द्यावरून संजयमामा शिंदे यांचे समर्थक काल पासुन ढोंगीपणा - भाग 1 "याचना स्वहिताची घोषणा मात्र लोकहिताची नाकाने वांगी सोलणाऱ्या प्रवक्त्यांनी याचा खुलासा करावा" असे शिर्षक देवुन सोशल मीडियावर पोस्ट फिरवत असुन या पोस्ट मधून पाटील गट व पाटील गटाच्या प्रवक्ते सुनिल तळेकर यांच्यावर शेलक्या शब्दात टिकेची झोड उठवली आहे.यावर सदर पोस्ट मध्ये कोकाटे यांचे निवेदन आहे व ते करमाळा मतदार संघात सोशल मेडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहे. हे जसेच्या तसे करमाळा चौफेर च्या वाचकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत
ढोंगीपणा - भाग 1 याचना स्वहिताची घोषणा मात्र लोकहिताची नाकाने वांगी सोलणाऱ्या प्रवक्त्यांनी याचा खुलासा करावा करमाळा तालुक्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांची भेट घेतल्याची बातमी तालुक्यात झळकली. त्यांच्यासोबत संजय कोकाटे, सोमेश नागनाथ शिरसागर या मंडळींनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते रामदास कदम यांचीही भेट घेतली व मतदार संघातील कामासंदर्भात चर्चा केली अशा आशयाच्या ठळक बातम्या आल्या. खरंतर हा लोकहीताचा कळवळा प्रत्येक आजी-माजी लोकप्रतिनिधींना असतोच .परंतु प्रत्यक्ष त्या भेटीमागे स्वहिताची याचना होती आणि घोषणा मात्र लोकहिताची होती हे त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रांमधून ठळकपणे दिसून येते 18 ऑगस्ट 2021 रोजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना माढा विधानसभा मतदारसंघातील संजय कोकाटे यांच्या लेटर पॅडवरून पत्र दिले गेले. त्या पत्रामध्ये करमाळा, माढा ,मोहोळ विधानसभा मतदारसंघातील शासकीय कामकाजातील व पक्ष संघटनेतील विविध अडचणी मांडलेल्या आहेत. राष्ट्रवादीचे पालकमंत्री असल्यामुळे जिल्हाधिकारी यांचे पासून ते सर्वसाधारण अधिकाऱ्यापर्यंत कोणीही आमचे काम ऐकत नाही... सर्वच गोष्टी पत्रांमध्ये सांगणे शक्य नाही त्यामुळे आम्हा तिघांना लवकरात लवकर भेटीची वेळ द्यावी ही याचना तीनही मंडळींनी सदर पत्रांमधून केलेली होती म्हणजेच आपले तिघांचेही बस्तान तीनही मतदारसंघांमध्ये बसविण्यासाठी चाललेला हा पक्षपातळीवरचा केविलवाणा प्रयत्न असताना , लोकांपुढे याचा विपर्यास करून नाकाने वांगी सोलणारे पाटील गटाचे प्रवक्ते मात्र म्हणतात की , ही भेट केवळ आणि केवळ विकासकामांसाठी होती .जर विकास कामासाठी भेट होती तर मग मग हे पत्र कशासाठी दिले ? भेटीसाठी वेळ का मागितली ? आणि हे जे पत्र दिले याची प्रसिद्धी वर्तमानपत्रातून का केली गेली नाही ? असे अनेक प्रश्न लोकांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे त्या प्रश्नांची उत्तरे प्रवक्त्यांनी द्यावीत आणि आपला हा ढोंगीपणा बंद करावां ही तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे
3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.