loader
Breaking News
Breaking News
Foto

खुपसे यांचे आंदोलन व पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केलेल्या टिकेनंतर आमदार संजय शिंदे यांचे पत्र व्हायरल!

करमाळा तालुक्यातील वीज महावितरण ने शेती पंपाचे विज कनेक्शन कट करण्याचा सपाटा लावला होता. या मुळे आगोदरच संकटात असलेला शेतकरी पुर्ण पणे हतबल झाला होता.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

प्रशासनावर पकड असलेले आमदार संजयमामा शिंदे कणखर भुमिका घेतील असे शेतकऱ्यांना वाटत होते मात्र शेतीपंपासाठी दोन तास वीज पुरवठा करा असे पत्र आमदार संजयमामा शिंदे यांनी दिल्यानंतर मात्र शेतकऱ्यांत नाराजी पसरली होती.दोन तासांमध्ये गुरांचा चारा-पाणी, कडबा कुट्टी , कुटूंबासाठी पिण्याचे पाणी, उरलेच तर घास अथवा तरकारीचे एक दोन गुंठे भीजवणे हि कामे अशक्य होती.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या या पत्राचा खरपूस समाचार घेतला होता ,तसेच अजुन त्या मागणीनुसार का होईना पण दोन तास देखील वीज सुरळीत झाली नसल्याने आमदाराच्या पत्राची बहुतेक प्रशासनाकडून दखल घेतली नसावी असे म्हणून उपरोधिक खिल्ली उडवली होती

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg

त्यानंतर अतुल खुपसे यांनी कुंभेज फाट्यावर गनिमी कावा पद्धतीने प्रशासनाला चकवा देत हजारोंच्या संख्येने आंदोलन केले होते . एकीकडे शेतकऱ्यांचा उद्रेक दुसरी कडे पाटील गटाकडून होत असलेली टिका व खुपसे यांच्या आंदोलनाच्या धसक्यानंतर आमदार संजयमामा शिंदे गटाकडून दोन तास वीज द्या मुद्यावरून यु टर्न घेतला असून उर्जा मंत्री यांना पत्र पाठवून वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी केली आहे.व त्या संदर्भात पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले आहे. आता या सर्व एकत्रीत प्रयत्नांना यश येऊन शेतकऱ्यांचा हा महत्त्वाचा प्रश्न सुटतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts