loader
Breaking News
Breaking News
Foto

दहिगाव उपसा सिंचन योजनेचे थकित वीज बिल कृष्णा खोरे महामंडळाने भरले आ. संजयमामा शिंदे यांची माहिती.

करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी व उन्हाळी आवर्तन तब्बल 112 दिवस चालले होते. या आवर्तनाचे 1 कोटी 2 लाख वीज बिल आलेले होते. त्यापैकी यापूर्वीच 46 लाख रुपये वीज बिल पाटबंधारे विभागाने भरलेले होते .थकित राहिलेले 56 लाख 4 हजार रुपये वीज बिल कृष्णा खोरे महामंडळाने नुकतेच भरले असल्याची माहिती करमाळा तालुक्याचे आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, आपण आमदार झाल्यापासून अद्याप एक रुपयाही पाणीपट्टीच्या नावाखाली लोकांकडून गोळा केलेला नाही. शासन दरबारी पाठपुरावा करून आपण कृष्णा खोरे महामंडळाला विज बिल भरण्यास भाग पाडले आहे. आत्तापर्यंत एकूण 2 कोटी 50 लाख रुपये वीज बिल दहिगाव योजनेचे भरलेले आहे. सध्या महावितरणकडून विज बिल वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू असली तरी दहिगाव योजनेचे वीजबिल भरल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करण्याचे कारण नाही असेही ते म्हणाले.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

दहिगाव उपसा सिंचन योजनेबद्दल लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे आणि लोकांना बारमाही पिके घेण्याकडे वळवणे हे आपले उद्दिष्ट असून ज्या वेळेस लोकांच्या हातामध्ये पैसे येईल त्यावेळेस ते आपोआपच पाणीपट्टी भरतील असा मला विश्वास आहे. दुसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेमधून उर्वरीत कामे वेगाने पूर्ण करणे आणि 10 हजार 500 हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आणले हे आपले धोरण आहे असेही ते म्हणाले.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts