loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार संजय शिंदे यांच्या पत्राची अद्यापही महावितरणने दखल घेतली नसावी पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांची आमदारांवर उपरोधिक टिका!

करमाळा तालुक्यातील शेतकरी अंधारात आहेत , आमदार संजय शिंदे यांच्या वीज टंचाई बाबतच्या पत्राची अद्यापही महावितरणने दखल घेतली नसावी, असा हल्लाबोल मा. आ. पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केला आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

करमाळा तालुक्यात सध्या थकीत वीजबिल मोहिम जोरदार पणे चालू असून अनेक शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली गेली आहेत. याबाबत बोलताना सुनील तळेकर म्हणाले की, करमाळा तालूक्यात विविध भागात वीज पुरवठ्याबाबत अनियमतता असुन काही ठिकाणी एक तास तर काही ठिकाणी दोन तास वीज पुरवठा केला जातोय. वीज कधी दिली जाणार याचे वेळापत्रक आखले नसल्याने शेतकरी दिवसभर वीजेच्या बल्बकडे डोळे लावून बसलेले आहेत. दिवसातून अवेळी एक अर्धा तास वीज दिली जात असुन या दरम्यान शेतकरी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी व जमीनीचा एखादा तुकडा भीजला गेला तर भिजवण्यासाठी धडपड करणाना आढळतोय.वीज बिल वसुली अवश्य केली जावी परंतू जगाच्या पोशिंद्याला असा त्रास व लाचारीची वागणुक देऊ नये. आमदार संजय शिंदे यांच्या कालावधीतच शेतकऱ्याला वेठीस धरण्याचे काम होत आहे. आमदार शिंदे यांनी मात्र जखमेवर मीठ चोळण्याचे काम महावितरणला पत्र देऊन केले आहे. या अगोदरच्या कोणत्याही लोकप्रतिनिधींनी दोन तास इतकी अल्प प्रमाणात वीज तालुक्यातील शेतकऱ्यांच्यासाठी मागतली नव्हती. वास्तविक पाहता आमदार शिंदे यांनी करमाळा तालूका महावितरणच्या करमाळा व जेऊर या दोन विभागाची तातडीची बैठक घेऊन शेतकऱ्याची वीज कनेक्शन तोडली जाऊ नयेत अशी सुचना देणे अपेक्षित होते. परंतू आमदार साहेबांनी वरीष्ठ अधिकाऱ्यांना पत्र पाठवून दोन तास वीज देण्याची मागणी केली आहे. या पत्राकडे वरीष्ठ अधिकाऱ्यांनी पुर्ण दुर्लक्ष केल्याने आता आ. शिंदे यांचीही वीजतोड मोहिमेस मुक संमती असावी हि शंका दाट होतेय.

शंभुराजे फरतडे ✍ (चौफेर प्रतिनीधी)

शेतकऱ्यांच्या पिकास अजुन बाजार भाव मिळायचा आहे. परंतु तो पर्यंत मात्र आज तालुक्यातील दुध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. गुराचा चारा-पाणी, चारा कडबाकुट्टी यासाठी वीजेची गरज असुन मोठ्या प्रमाणावर गोपालन केलेले शेतकरी वीज टंचाईमुळे हैराण झालेले आहेत. तसेच कुकटपालन करणारा शेतकरीही नव्याने विकत घेतलेली पिल्ले वीजेअभावी मरताना डोळ्यांनी पहात आहे. शेतकर्‍यांच्या आर्थिक जडणघडणीत महत्वाची जबाबदारी पार पाडणारे हे दोन पुरक व्यावसाय धोक्यात आले आहेत. विद्यमान आमदार मात्र केवळ पत्र पाठवून आपली जबाबदारी संपली म्हणुन हात झटकण्याचा प्रयत्न करत आहेत. सन 2014 ते 2019 या दरम्यान तत्कालीन आमदार नारायण पाटील यांच्या कालावधीत अशी वेळ शेतकऱ्यांवर कधी आली नव्हती व पाटील यांनी येऊही दिली नाही. वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले पण शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडले नाही.आमदारकी केवळ मिरवण्यापुरती नसते तर मतदार संघातील प्रत्येक घटकास न्याय मिळवून देण्यासाठी असते. प्रशासन व जनता या दोघांमधील लोकप्रतिनिधी हा महत्त्वाचा दुवा असुन आज आमचे विद्यमान आमदार मात्र प्रशासनाची बाजू धरत असल्याचे दुर्दैव पाहण्याची वेळ मतदार संघाच्या वाटणीस आली आहे,अशी खंत सुनील तळेकर यांनी व्यक्त केली.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts