loader
Breaking News
Breaking News
Foto

मि मतदार संघात नसल्याने वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यास येण्याची तसदी घेवु नये - नारायण आबा पाटील

कोरोनाचे संकट अजून कायम असल्याने कार्यकर्त्यांनी माझा वाढदिवस साजरा न करता सामाजिक उपक्रम आयोजित करावेत. करमाळा मतदार संघाचे चांगले स्वास्थ्य हेच माझे उद्दीष्ट आहे, असे मत माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त केले असुन मि मतदार संघात उपस्थित नसल्याने प्रत्यक्ष शुभेच्छा देण्यास येण्याची तसदी घेवु नये असे आवाहन देखील कार्यकर्त्यांना केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/IMG-20200818-WA0210.jpg

दि 23 ऑगस्ट रोजी माजी आमदार नारायण पाटील यांचा वाढदिवस असुन यानिमित्ताने करमाळा मतदार संघातील अनेक ठिकाणी रक्तदान शिबिर व वृक्षारोपणाचा उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याबाबत मा. आ. नारायण पाटील यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, वास्तविक अगदी पहिल्या पासुन गेली अनेक वर्षे माझा वाढदिवस हा सामाजिक उपक्रमांनीच साजरा करावा असे मी कार्यकर्त्यांना सांगत असतो. आजमितीस मला माझ्या मतदार संघातील सर्वसामान्य नागरिकांचे स्वास्थ्य महत्वाचे वाटत असल्याने व करमाळा तालूक्यावर अजुनही कोरोनाचे संकट अधिक गडद असल्याने माझा वाढदिवस साजरा करु नये अशी सुचना मी कार्यकर्त्यांना दिली आहे. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून गावोगावी रक्तदान शिबिर अथवा वृक्षारोपण यासारखे सामाजिक हिताचे उपक्रम राबविले जावेत. कोरोना मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गोरगरीब व उपेक्षित घटकांना मदत करावी, ह्याच माझ्यासाठी शुभेच्छा राहतील. कोरोना कालावधीतील कडक निर्बंध पाळले जाणे महत्वाचे असल्याने नागरिकांनी गर्दीचे प्रसंग टाळावेत. मी स्वतः उद्या मतदार संघात नसल्याने कोणीही भेटीसाठी जेऊर येथील कार्यालयात येण्याची तसदी घेऊ नये असे ही पाटील यांनी नमुद केले.

✍ चौफेर प्रतिनीधी

आपल्या शुभेच्छा मला नेहमीच प्रेरणादायी अशाच आहेत व मी कायम जनतेच्या ऋणात राहणे पसंद करतो. तरी कार्यकर्त्यांनी व हितचिंतक मंडळींनी वाढदिवसानिमित्त भेट अथवा गर्दीचे आणि प्रवासाचे प्रसंग टाळावेत, असे आवाहन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले आहे.

http://karmalachaufer.com//assets/images/2020/add/2020/BM-400x270.jpg
foto
Author: करमाळा चौफेर

3 Comments

leave a reply

Recent Posts